‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर

फिल्ममेकर्सनी या चित्रपटाची तारीख अगोदर 9 जून निश्चित केली होती. पण आता ही फिल्म एक महिन्यानंतर म्हणजेच 7 जुलै 2017 ला चित्रपटगृहात झळकणार आहे.

‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर रिलीज, प्रदर्शनाची तारीख लांबणीवर
Published: 10 May 2017 05:10 PM  Updated: 10 May 2017 05:10 PM

'बॉलिवूडचा हँडसम हंक' म्हणून ओळखल्या जाणा-या हृतिक रोशनने सोशल नेटवर्किंग साइटवरून‘हृदयांतर’ चित्रपटाची रिलीज डेट 9 जून 2017 असल्याचं जाहिर केले होते.मात्र काही कारणामुळे हा सिनेमा लांबणीवर पडला आहे. होय, 9 जून ऐवजी हा सिनेमा आता 7 जुलैला रिलीज करायचा निर्णय घेण्यात आला आहे. फॅशन डिझाइनर विक्रम फडणीस आपल्या पहिल्या मराठी फिल्म ‘हृदयांतर’व्दारे लेखक-दिग्दर्शक-निर्माता म्हणून चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवत आहे. विक्रमच्या भावनात्मक नाट्य असलेल्या ‘हृदयांतर’ सिनेमाचे पोस्टर मंगळवारी रिलीज झाले. विक्रम फडणीस दिग्दर्शित ‘हृदयांतर’ चित्रपटामध्ये सोनाली खरे, मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भूमिका आहेत.फिल्ममेकर्सनी या चित्रपटाची तारीख अगोदर 9 जून निश्चित केली होती. पण आता ही फिल्म एक महिन्यानंतर म्हणजेच 7 जुलै 2017ला चित्रपटगृहात झळकणार आहे.याविषयी निर्माता-दिग्दर्शक विक्रम फडणीस म्हणतो, “ही फिल्म मोठ्यांनीच नाही तर लहान मुलांनीही पाहाता यावी, हा कौटुंबिक भावनात्मक  चित्रपट आहे. त्यामुळे प्रत्येक आई-वडिलांनी त्यांच्या मुलांसह हा चित्रपट पाहावा. जून महिना लागतचा शाळा सुरू होतील त्यातच सगळे बिझी असतील त्यामुळे सगळे रसिक त्यांच्या धावपळीतून निवांत होतील तेव्हाच हा चित्रपट  7 जुलैला रिलीज करायचा निर्णय घेतलाय.”सुपरस्टार हृतिर रोशन आणि टेलिविजन होस्ट मनिष पॉलच्या ही चित्रपटात विशेष भूमिका असून  मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे तब्बल नऊ वर्षांनी एकत्र दिसणार आहेत.सगळ्यांत विशेष म्हणजे  खुद्द बॉलिवूडचा हँडसम हंक' हृतिक रोशनही या चित्रपटात पाहूणा कलाकराच्या भूमिकेत झळकणार आहे. 

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :