प्रसाद ओक दिग्दर्शित ​कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर लाँच!

​कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांच्या मनात या चित्रपटाविषयी चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.

प्रसाद ओक दिग्दर्शित ​कच्चा लिंबूचा स्पेशल ट्रेलर लाँच!
Published: 17 Jul 2017 11:41 AM  Updated: 17 Jul 2017 11:41 AM

अभिनेता प्रसाद ओकचा स्वतंत्र दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून रवी जाधव यांचा पहिला चित्रपट असलेल्या कच्चा लिंबू या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच झाला. या सिनेमाचा ब्लॅक अँड व्हाईट क्लासिक लूक प्रेक्षकांना प्रचंडच भावत आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, सचिन खेडेकर, मनमीत पेम, अनंत महादेवन अशी तगडी स्टारकास्ट आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे. रिक्रिएशन अँड मिडीया प्रा. लि. प्रस्तुत आणि टीमवर्क अल्ट्रा क्रिएशन्स आणि मंदार देवस्थळी निर्मित कच्चा लिंबू या चित्रपटाच्या ट्रेलर लाँच प्रसंगी या चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
‘साध्या माणसांची स्पेशल गोष्ट’ या आगळ्या वेगळ्या टॅग लाईनमुळे उत्सुकतेचा विषय ठरलेल्या ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आपण सगळेच सुखाच्या शोधात असतो. आपल्या आयुष्याकडून साध्या सरळ अपेक्षा असतात. पण कधी कधी वरच्याच्या मनात आपल्यासाठी काही वेगळेच प्लॅन असतात आणि मग अचानक हे साधे, सरळ वाटणारे आयुष्य स्पेशल होऊन जाते. या अनपेक्षितपणे आलेल्या वळणाला हसतमुखाने सामोरे जाणे म्हणजेच आयुष्य जगणं असतं. असेच साधे सरळ पण तितकेच ‘स्पेशल’ असणारे काटदरे कुटुंब आपल्याला प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’च्या टीझरमध्ये पाहायला मिळाले होते. हा चित्रपट ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.
रवी जाधवने नटरंग, टाइमपास यांसारख्या हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. कच्चा लिंबू या चित्रपटाद्वारे तो पहिल्यांदाच अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे तर प्रसाद ओकने आजवर आपल्या अभिनयाने अनेक प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.



Also Read : प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’चा टीझर प्रदर्शित!
 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :