​'बंदूक्या' होणार १ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित

अभिनेत्री अतिशा नाईक आणि अभिनेता शशांक शेंडे यांची प्रमुख भूमिका असलेला बंदूक्या हा चित्रपट 1 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

​'बंदूक्या' होणार १ सप्टेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित
Published: 03 Jul 2017 04:58 PM  Updated: 03 Jul 2017 04:58 PM

"बंदूक्या".... या राज्य शासनाने या वर्षी विविध पुरस्कारांनी गौरविलेल्या चित्रपटाबद्दल बरीच चर्चा होत आहे. या सिनेमा विषयी मराठी तसेच इतर भाषिक प्रेक्षकांनाही रिलीजची उत्सुकता लागलेली आहे.  "काय गं डंगरे, कशाला नाचतीस?....तुझ्या आईच्या वरातीत नाचती"; अशी तुफान डायलॉगबाजी असलेला "बंदूक्या" हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. राजेंद्र बॊरसे आणि प्रतिभा बोरसे यांच्या वर्षा सिनेव्हिजनची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन राहूल मनोहर चौधरी यांनी केले आहे. समाजामध्ये अस्तित्वात असलेल्या हृदय हेलावणाऱ्या रूढी परंपरेची झलक या सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाबाबत अधिक माहिती देताना सिनेमाचे दिग्दर्शक राहुल मनोहर चौधरी म्हणाले, 'बंदूक्या' सिनेमातील पात्रांच्या भाषेतच शिव्या हा अविभाज्य घटक असल्याचे हे दिग्दर्शक, लेखक यांनी सेन्सॉर बोर्डला पटवून दिले. त्यामुळे या चित्रपटातील आशय तितक्याच ताकदीने पोहचविण्यासाठी सेन्सॉर बोर्डानेही सकारात्मक भूमिका घेत विविध महोत्सवात गाजणाऱ्या या महत्वपूर्ण सिनेमाला प्रथमतःच मान्यता दिलेली आहे. नुकत्याच झालेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात 'बंदूक्या' सिनेमाने ६ नामांकने आणि ४ राज्य पुरस्कार पटकावले आहेत. सर्वोत्कृष्ट संवाद, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट, सर्वोत्कृष्ट स्त्री कलाकार पदार्पण या पुरस्कारांमुळे या सिनेमाची उंची नक्कीच उंचावली आहे. अभिनेत्री अतिशा नाईक, अभिनेता शशांक शेंडे, नामदेव मुरकूटे, निलेश बोरसे, अमोल बागुल, तन्मयी चव्हाणके, उन्नती शिखरे यांच्या सिनेमात प्रमुख भूमिका आहेत. या सिनेमाची भाषाच निखळ मनोरंजन करणारी असल्याने प्रेक्षकांना याचा अनुभव नक्की घ्यायला आवडेल. अस्सल गावरान शिव्या या विशिष्ट बोली भाषेचा एक अविभाज्य आणि संरक्षक घटक असल्याने 'बंदूक्या' हा  वेगळ्या धाटणीचा तसेच  मनोरंजनाच्या नेहमीच्या चौकटी बाहेरचा सिनेमा प्रेक्षकांची वाहवा मिळवेल यात शंका नाही. 'बंदूक्या' हा सिनेमा १ सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होत आहे. या सिनेमाचे प्रमोशन आणि मार्केटिंग 'सीबा पीआर आणि मार्केटिंग' सांभाळत आहेत.

Also Read : अतिशा नाईक आणि शशांक शेंडे यांचा बंदूक्या


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :