​अशोक सराफ झळकणार सेंटिमेंटलमध्ये

पोस्टर बॉइज, पोस्टर गर्ल यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक समीर पाटील सेंटिमेंटल हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. या चित्रपटाद्वारे अशोक सराफ अनेक वर्षांनंतर चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटात उपेंद्र लिमयेदेखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

​अशोक सराफ झळकणार सेंटिमेंटलमध्ये
Published: 12 Apr 2017 03:40 PM  Updated: 12 Apr 2017 03:40 PM

अशोक सराफ हे मराठी इंडस्ट्रीतील एक महत्त्वाचे नाव मानले जाते. त्यांनी त्यांच्या अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीमध्येदेखील त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी अशी ही बनवा बनवी, आयत्या घरात घरोबा, नवरी मिळे नवऱ्याला यांसारख्या अनेक चित्रपटात दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. केवळ मराठीतच नव्हे तर हिंदी चित्रपटातही ते अनेक चांगल्या भूमिकेत झळकले आहेत. यस बॉ़स, करण अर्जुन, सिंघम यांसारख्या चित्रपटात त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. यासोबतच त्यांनी एकेकाळी छोटा पडदादेखील गाजवला होता. त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या हम पाच या मालिकेला तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. पण गेल्या काही वर्षांपासून ते खूपच कमी मालिका, चित्रपट, नाटकांमध्ये काम करत असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे. ते सध्या त्यांची भूमिका अतिशय चोखंदळपणे निवडत आहेत. एखादी भूमिका अतिशय आवडल्याशिवाय करायचीच नाही असेच त्यांनी ठरवले आहे. पण आता अशोक सराफ अनेक वर्षांनंतर प्रेक्षकांना एका चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. पोस्टर गर्ल, पोस्टर बॉइज यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन समीर पाटील यांनी केले होते. समीर पाटील पोलिसांच्या आयुष्यावर सेंटिमेंटल नावाचा चित्रपट बनवत असून या चित्रपटात अशोक सराफ महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटात ते पोलिसांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाची कथा त्यांना अतिशय आवडल्यामुळे त्यांनी या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. या चित्रपटात अशोक सराफ यांच्यासोबत उपेंद्र लिमयेदेखील काम करत आहे. सेंटिमेंटल या चित्रपटात मुंबई पोलिसांच्या मानसिकतेवर कॉमेडीच्या अंगाने भाष्य केले जाणार आहे.


पब्लिसिटीसाठी इशा गुप्ता करतेय का बोल्ड फोटोशूट?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :