तर असे अश्विनी भावे आणि तिच्या चाहत्यांमधील अंतर होणार कमी!

अश्विनीची फॅन फॉलोविंग हि प्रचंड प्रमाणात आहे.फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभर तिचे चाहते आहेत.तिचे चाहते हे नेहमीच तिला नवनवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असतात. तिच्याबद्दल जितकं जास्त जाणून घेता येईल याकडे नेहमीच त्यांचा कल असतो. काही दिवसांपूर्वी अश्विनी भावे हिने तिच्या सोशल मीडियावर लाल गाऊन परिधान केलेला तिचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सर्व नेटिझन्समध्ये एकच चर्चा सुरु झाली, हा फोटो अश्विनीने नेमका का अपलोड केला असावा? तिने हे ग्लॅमरस फोटोशूट नक्की का केलं? तिचा नवीन चित्रपट येतोय का? असे अनेक तर्क वितर्क लावले गेले. या फोटोशूटचं उत्तर म्हणजे अश्विनी भावे यांची वेबसाईट.

तर असे अश्विनी भावे आणि तिच्या चाहत्यांमधील अंतर होणार कमी!
Published: 19 Sep 2017 01:58 PM  Updated: 19 Sep 2017 01:58 PM

अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव गेली २ दशके या क्षेत्रात कार्यरत आहे. तिने केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनहि जिवंत आहेत. फक्त मराठीतच नाही तर तिने तिच्या कलाकृतीने बॉलिवूड मध्ये वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.बॉलीवूडच्या बड्या बड्या स्टार्स सोबत तिने काम केलं आहे. फक्त तिचे फॅन्सच नाहीतर चित्रपट समीक्षकांनीहि तिच्या कामाची नेहमीच तारीफ केली आहे. लग्नानंतर ती अमेरिकेत जाऊन स्थायिक झाली. गेल्याच वर्षी ती पुन्हा तिच्या मायदेशात परतली आणि तिने तिच्या कारकिर्दीची पुन्हा नव्याने सुरुवात केली. इतके वर्षे अमेरिकेत राहून हि तिच्यात पाश्चिमात्य संस्कृतीचा प्रभाव दिसला नाही. तिची भाषा, पेहराव हे सगळंच आजही तसंच आहे. यातून ती आपल्या मातीशी किती जोडली आहे हे दिसून येतं. भारतात परतल्यावर तिची सिनेमाप्रती असलेली ओढ दिसून आली आणि बहुतेक याच कारणास्तव तिने परत चित्रपटात काम करण्यास सुरुवात केली. या वर्षी तिचे ‘ध्यानीमनी’ आणि ‘मांजा’ हे दोन सिनेमे प्रदर्शित झाले आणि दोन्ही चित्रपटातील तिचे काम लोकांनी खूप पसंत केले. वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही सिनेमात तिने आईची भूमिका बजावली पण त्या दोन्ही भूमिकेंमधील आई हि परस्पर विरोधी होती पण तिने अगदी सहज त्या निभावल्या बहुतेक म्हणूनच तिचा चाहता वर्ग एवढ्या प्रमाणात आहे.अश्विनीची फॅन फॉलोविंग हि प्रचंड प्रमाणात आहे. फक्त भारतातच नाहीतर संपूर्ण जगभर तिचे चाहते आहेत.तिचे चाहते हे नेहमीच तिला नवनवीन भूमिकेत पाहण्यासाठी उत्सुक असतात. तिच्याबद्दल जितकं जास्त जाणून घेता येईल याकडे नेहमीच त्यांचा कल असतो. काही दिवसांपूर्वी अश्विनी भावे हिने तिच्या सोशल मीडियावर लाल गाऊन परिधान केलेला तिचा एक अतिशय सुंदर फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर सर्व
नेटिझन्समध्ये एकच चर्चा सुरु झाली, हा फोटो अश्विनीने नेमका का अपलोड केला असावा? तिने हे ग्लॅमरस फोटोशूट नक्की का केलं? तिचा नवीन चित्रपट येतोय का? असे अनेक तर्क वितर्क लावले गेले. या फोटोशूटचं उत्तर म्हणजे अश्विनी भावे यांची वेबसाईट. अश्विनी भावे हिने नुकतीच स्वतःची www.ashvinibhave.com हि वेबसाईट लाँच केली आणि वेबसाईटचे आकर्षण म्हणजे अश्विनी भावेचे एक्सक्लुसिव्ह असे फोटोज. आजहीतिच्या सुंदरतेचे मापदंड देणारे असे ते फोटोज प्रेक्षकांना तिच्या या वेबसाईटवर पाहायला मिळतील.अश्विनीबद्दल सर्वच माहिती तिच्या या वेबसाईटवर अगदी सहजरित्या मिळणार आहे. फक्त चित्रपटच नाही,तर तिच्या संपूर्ण आयुष्याची कारकीर्द त्यांना जवळून अनुभवता येईल. या वेबसाईटद्वारे तिच्या फॅन्सना तिच्या संपूर्ण आयुष्याचा सफर घेता येईल. किशोर वयापासून ते आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टींची नोंद त्यात आहे. तिचे सिनेसृष्टीतील पदार्पण आणि अमेरिकेतील स्थलांतर याबद्दल सारं काही या वेबसाईटवर प्रेक्षकांना वाचायला मिळणार आहे. तिने केलेले चित्रपट, भूमिका आणि त्यातील छायाचित्र या सगळ्याचा त्यात समावेश आहे.तिने वेबसाईट मध्ये ४ वेगळ्या कथांचा समावेश केला आहे त्यात तिने केलेल्या 'हळद रुसली कुंकू हसलं' या चित्रपटा दरम्यान झालेले किस्से तिने मांडले आहेत सोबतच त्यात तिच्या 'राजा सन्यास' या नाटकात आणि ‘आर के स्टुडिओ’ मध्ये अनुभलेल्या प्रसंगातून मिळालेली शिकवण याची नोंद केली आहे. हे सर्व वेबसाईटच्या पेज वरील फिल्मी स्टोरीस यात पाहायला आणि वाचायला मिळेल. तिचे अनेक ब्लॉग्स आणि तिच्या दैनंदिन जीवनाचे वर्णन ती या वेबसाईटद्वारे करणार आहे आणि या सगळ्या घडामोडी ती रोज अपडेट करणार आहे. 'द ह्यूमन एक्सपेरिमेंट' 'वारली आर्ट अँड कल्चर' अशा २ डॉक्युमेंट्री आणि कदाचित या चित्रपटाची तिने निर्मिती केली आहे आणि याची संपूर्ण माहिती यात नोंदवली आहे. इतकंच काय तर या वेबसाईटद्वारे रसिक प्रेक्षक अश्विनी भावे सोबत थेट संवाद साधू शकतील.याचा निष्कर्ष असा आहे कि आता अश्विनी भावेच्या फॅन्सना तिचं आयुष्य जवळून अनुभवता येईल आणि ते तिच्या सोबत जगता हि येईल,हि वेबसाईट एका अर्थाने त्यांच्यासाठी सुरेख अशी मेजवानी असेल.

Also Read:अश्विनी भावे यांच्या ग्लॅमरस फोटोमागचं गुपित काय?

 


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :