अशोक सराफ लवकरच या मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार

सिनेमाच्या टीमसोबत अशोक सराफ आणि अनिकेत विश्वासराव यांचे काही फोटो समोर आले आहेत.या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सिनेमाच्या नायिकेचं नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.या सिनेमाचं दिग्दर्शन प्रविण कराळे करणार आहेत.

अशोक सराफ लवकरच या मराठी सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार
Published: 12 Oct 2017 03:11 PM  Updated: 12 Oct 2017 03:11 PM

गेल्या अनेक वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि अभिनयाचे सम्राट अशी मराठी रसिकांनी ज्यांना उपाधी दिली ते म्हणजे अभिनेता अशोक सराफ. मराठी, हिंदी सिनेमासह मालिका आणि नाटक अशा विविध माध्यमांमध्ये अशोक सराफ यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अशोक मामा नावाने रसिकांमध्ये प्रसिद्ध असलेल्या अशोक सराफ यांनी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. तरुणपणे जितक्या समर्थपणे त्यांनी प्रत्येक भूमिका साकारली तितक्याच समर्थपणे प्रत्येक भूमिका आजही निभावताना पाहायला मिळत आहेत. वाढत्या वयामुळे त्यांच्यामधील अभिनयाचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. त्यामुळेच की काय तितक्याच ताकदीने किंबहुना आधीपेक्षा जास्त उत्साहाने आणि एनर्जीने ते प्रत्येक भूमिका साकारतात आणि रसिकांवर जादू करतात. त्यांच्या याच गुणामुळे रसिकांना आजही त्यांच्या सिनेमाची प्रतीक्षा असते.नुकतेच समीर पाटील दिग्दर्शित 'शेंटिमेंटल' या सिनेमात अशोक सराफ यांनी पोलिसाची भूमिका साकारली होती.या सिनेमालाही रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अशोकमामा आता कोणती वेगळी भूमिका साकारणार, त्यांचा कोणता नवा सिनेमा असणार अशी प्रतीक्षा करणारा रसिक आहे. याच रसिकांसाठी एक गुडन्यूज आहे. रसिकांचे लाडके अशोक मामा म्हणजेच अशोक सराफ लवकरच रसिकांच्या भेटीला येत आहेत. एका आगामी मराठी सिनेमात ते भूमिका साकारणार आहेत. या सिनेमाचं नाव 'हृदयात समथिंग समथिंग' असं आहे. या सिनेमात अशोक सराफ यांच्यासह आजच्या पीढीचा आणि तरुणाईचा लाडका अभिनेता अनिकेत विश्वासराव झळकणार आहे. सिनेमाच्या टीमसोबत अशोक सराफ आणि अनिकेत विश्वासराव यांचे काही फोटो समोर आले आहेत.या सिनेमात कोणती अभिनेत्री झळकणार हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सिनेमाच्या नायिकेचं नाव अजूनही गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे.पिरॅमिड फिल्म्स प्रॉडक्शन बॅनरखाली हा सिनेमा बनणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन प्रविण कराळे करणार आहेत. नवीन श्रीराम यांचं संगीत या सिनेमाला लाभणार आहे. त्यामुळे लवकरच अशोकमामा आणि अनिकेत विश्वासराव यांचा धम्माल अंदाज रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :