Exclusive नेहा मल्याळम नंतर कॅनेडियन चित्रपटात

निळकंठ मास्तर, युथ यासारख्या चित्रपटांमध्ये भुमिका साकारुन अभिनेत्री नेहा महाजन प्रेक्षकां समोर आली. निळकंठ मास्तर सारख्या ऐतिहासिक चित्रपटातील दमदार अभिनयामुळे नेहा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. तर तिच्या या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखील झाले. नूकत्याच प्रदर्शित झालेल्या युथ मधील तिच्या रोलला देखील तिच्या चाहत्यांकडुन

Exclusive    नेहा मल्याळम नंतर कॅनेडियन चित्रपटात
Published: 15 Jul 2016 03:14 PM  Updated: 15 Jul 2016 03:15 PM

  प्रियांका लोंढे

             निळकंठ मास्तर, युथ यासारख्या चित्रपटांमध्ये भुमिका साकारुन अभिनेत्री नेहा महाजन प्रेक्षकां समोर आली. निळकंठ मास्तर सारख्या ऐतिहासिक चित्रपटातील दमदार अभिनयामुळे नेहा प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात राहिली. तर तिच्या या अभिनयाचे सर्वत्र कौतुक देखील झाले. नूकत्याच प्रदर्शित झालेल्या युथ मधील तिच्या रोलला देखील तिच्या चाहत्यांकडुन वाहवा मिळाली. तर मल्याळम चित्रपटातील तिच्या न्युड सीन्सची तर चांगलीच चर्चा झाली अन नेहा महाजन हे नाव एकदम लाईम लाईटमध्ये आले. द पेंटेड हाऊस या चित्रपटातील हे सीन्स असुन ते मी केवळ त्या भुमिकेची गरज म्हणुन केल्याचे स्पष्टीकरण नेहाने दिले होते. सध्या नेहा काय करीत आहे, कोणत्या चित्रपटांमध्ये ती आपल्याला दिसणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे.  मल्याळम चित्रपटानंतर आता  नेहाने डायरेक्ट उडी घेतली आहे इंटरनॅशनल चित्रपटामध्ये.  सीएनएक्सला दिलेल्या मुलाखतीत नेहाने स्वत: या बातमीचा खुलासा केला असुन ती म्हणाली मी आता एका कॅनेडियन चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. नेहा सध्या परदेशात या चित्रपटाचे शुटिंग करीत असुन ती लवकरच भारतात परतणार असल्याचेही तीने सांगितले. या चित्रपटाच्या कथेविषयी तर नेहाने काहीच उलगडा केला नसुन या चित्रपटाचे नाव देखील गुलदस्त्यात आहे. द पेंटेड हाऊस ची चर्चा तर सर्वत्रच झाली आहे. आता पाहुयात की या कॅनेडियन चित्रपटात नेहा काय कमाल करतीये याच्याच प्रतिक्षेत तिचे चाहते नक्कीच असतील. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :