Exclusive सांगत्ये ऐका !

सिनेमात नग्नता असली तरी यांत बिभत्सतेचा लवलेशही नाही

Exclusive  सांगत्ये ऐका !
Published: 27 Jun 2016 01:04 PM  Updated: 28 Jun 2016 11:14 AM

- सुवर्णा जैन

अभिनेत्री नेहा महाजन तिच्या न्यूड एमएमएसमुळं सध्या चर्चेत आलीय. हॉलीवुड स्टाईलनं नेहानं स्वतःला एक्सपोझ केल्याचा हा व्हिडीओ व्हायरल झालाय. सोशल मीडिया आणि व्हॉट्स ऍपवर याच व्हिडीओची चर्चा आहे.. LOKMAT.COM ने सुद्धा हा व्हिडीओ शेअर करताच तो तुफान हिट ठरलाय.. दिवसभरात 13 हजार नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहिलाय.LOKMAT.COMवरही सध्या याच व्हिडीओची चर्चा सुरु आहे. तिचा हा पब्लिसिटी स्टंट आहे की काय याविषयी तर्कवितर्क सुरु आहेत. मात्र हा एमएमएस म्हणजे पैशांसाठी किंवा पब्लिसिटी केलेला स्टंट नसून एका सिनेमातला सीन असल्याचा खुलासा नेहानं लोकमत-सीएनएक्सकडे केलाय. पेटेंड हाऊस नावाचा मल्याळी सिनेमा करत असून त्यातील भूमिकेची गरज म्हणून हा सीन केल्याचा दावा नेहानं केलाय. एक वृद्धत्वाकडे झुकलेला लेखक हे या सिनेमातलं प्रमुख पात्र. या लेखकाला मृत्यू खुणावतोय आणि त्याचा परिणाम म्हणून स्वतःच्या गत आयुष्याकडे पाहाताना तो त्याच्यातल्या स्त्री आणि पुरुष या प्रवृत्ती त्याला दिसतात. या स्त्री प्रवृत्तीची एक प्रतिमा म्हणजे माझं पात्र असं नेहानं सांगितलंय.
ही अतिशय आव्हानात्मक भूमिका असून त्यात काही प्रमाणात नग्नता असली तरी यांत बिभत्सतेचा लवलेशही नाही , याची खात्री पटल्यानंतरच भूमिका स्वीकारल्याचं नेहानं म्हटलंय. ही भूमिका साकारणं म्हणजे वैचारिक प्रगल्भतेतून घेतलेला निर्णय होता असंही तिनं सांगितलंय. सिनेमा पूर्ण संदर्भासहित पाहिला तर या न्यूड दृष्यांविषयीचा दृष्टीकोन बदलेल याची खात्री आहे असंही नेहानं सीएनएक्सशी संवाद साधताना म्हटलंय.

नेहानं मराठी, हिंदी आणि या मल्याळी सिनेमाआधी दोन आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही काम केलंय. कलाकार म्हणून कथा आवडली आणि जे काही आव्हानात्मक असेल ते ते करायला आवडतं आणि ते करते असंही नेहानं स्पष्ट केलंय. कलेसाठी कोणत्याच गोष्टीचे नियम आणि बंधनं नाहीत. परदेशात या गोष्टी चालतात आणि आपल्याकडे नाही असं एक कलाकार म्हणून मला वाटत नाही, असंही नेहानं सांगितलंय. आपल्या अभिनयातून योग्य तो संदेश पोहचणं तिला महत्त्वाचं वाटतं. या मल्याळी सिनेमातल्या भूमिकेत सौंदर्य दडलं असल्याचंही तिचं म्हणणं आहे. या भूमिकेविषयी आणि न्यूड सीनबद्दल आपल्या पालकांनाही पूर्ण कल्पना दिल्याचं नेहानं सांगितलंय. “माझ्या आई वडिलांना या सिनेमातल्या भूमिकेचं गांभीर्य समजलं आणि त्यांनीही या सीन्ससाठी पूर्णपणे पाठिंबा दिला. माझी आई इंग्रजी विषयाची प्राध्यापिका आहे आणि वडिल लेखक आहेत. त्यांच्याशी या विषयावर चर्चा झाली. त्यांनाही याबाबत सगळी कल्पना आणि जाणीव आहे. इतकंच नाहीतर या माझ्या मित्र आणि प्रसिद्ध दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनीही आपल्या भूमिकेचं कौतुक केलंय” असं नेहानं सांगितलं.

या न्यूड सीन्समध्ये, मल्याळी सिनेमातील भूमिकेत कोणताही आंबट शौकिनपणा नसल्याचा दावा नेहानं केलाय. आपल्यावर विश्वास ठेवण्याचं आवाहन तिनं तिच्या फॅन्सना आणि रसिकांना केलंय. जसा आपल्या विचारांना पटला, तसा तुमच्या विचारांना पटणारा हा मल्याळी सिनेमा आणि भूमिका असल्याचं नेहानं म्हटलंय. त्यामुळं आधी सिनेमा बघा आणि मगच त्यावर प्रतिक्रिया द्या, थेट प्रतिक्रिया आणि टीका करणं चुकीचं असल्याचं आवाहनही तिनं केलंय.  ‘पेटेंड हाऊस’ सिनेमाती दृष्य

नेहा महाजनच्या या न्युड सीनविषयी मराठी सिने दिग्दर्शक -कलाकारांचं काय म्हणणं आहे पुढे वाचा. 


सुजय डहाके, दिग्दर्शक  - त्यामध्ये एवढं गांभिर्यानं बघायला नको असं वाटतं. ते कामासाठीच तिने तसं केलंय. कथानकाची गरज असते म्हणून असे सीन कलाकाराला करावे लागतात. कोणालाही उगाच एक्सपोज करायला आवडणार नाही. सिनेमाची गरज हेच त्याचं उत्तर आहे. त्याचबरोबर समाजाने आणि इतरांनीही त्याचा इतका गवगवा करू नये आणि विचारही करू नये. 

समृध्दी पोरे,दिग्दर्शिका- आपण कितीही म्हटलं तरी प्रेक्षक कलाकाराला भूमिकेशी जुळूवून घेतात. सिनेमाची गरज होती म्हणून कलाकाराने जर असं केल आहे, असं म्हटलं तर या क्षेत्रात ज्यांना कलाकार म्हणून करिअर करायचं आहे. त्यांच्या पर्यंत चुकीचा मेसेज जावू शकतो. अजूनही आपला प्रेक्षक वर्ग हा इतका प्रगल्भ झालेला नाहीय. प्रत्येक गोष्टी एका लिमिट पर्यंत असणं गरजेचं आहे, मात्र आता अशा प्रकारचे नग्न दृष्य करावं की नाही हे सर्वस्वी कलाकाराचा वैयक्तीक प्रश्न आहे.एक दिग्दर्शिका म्हणून जर मला नेहाला जिजामाता किंवा झाँसीची राणी अशा प्रकारेच भूमिका ऑफर करण्याचा मी विचार करू शकत नाही.कारण याला प्रेक्षकच स्विकारणा नाहीत. दुसरीकडे कुठल्याही कामाचे शुटींग तेवढचं एडिट करून  वाईट पध्दतीने डिजीटल मिडीयावर न विचारता प्रसिध्द करणं हे फार चुकीचं आहे. आदिनाथ कोठारे, अभिनेता - सिनेमाच्या पटकथेची मागणी असल्यास,कलाकारने अशाप्राकराचे सीन देण्यात काही चुकीचे आहे असं वाटत नाही. नेहा सोबत मी काम केलेले आहे.नेहा ही खूप चांगली अभिनेत्री आहे. त्यामुळे तिने कोणतीही गोष्ट करतांना नक्कीच विचार करूनच केला असेन. मी तो सिनेमा पाहिलेला नाही. पण दृष्यांची गरज असल्यास तीनं सीन दिला असेन तर त्यात काहीही वावगं वाटत नाही. 
 


क्रांती रेडकर - अभिनेत्री,दिग्दर्शिका -  आपली मराठी मुलगी म्हणून मराठी प्रेक्षक तर स्विकारणारच नाही. अजुनही मराठी प्रेक्षक अशा गोष्टीं स्विकारण्यासाठी तयार नाहीयेत. एका कलाकाराने किती कपडे घालावे किंवा त्यानं कशा प्रकारच्या भूमिका स्विकाराव्यात हा तिचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यासाठी कलाकाराचीही मानसिकता तितकीच मह्त्त्वाची आहे. आता हेच बघा ना ! एखादा कलाकार निगेटीव्ह रोल करत असला तरी आपला प्रेक्षक त्याच्यावर चिडतो की त्याने असं का केल असावं असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडतात इतका कलाकारांप्रती आपला प्रेक्षक भावूक असतो. 


 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :