व्हायच होत डान्सर.... झाले अ‍ॅक्टर

  दुनियादारीतील सोज्वळ, लाजरीबुजरी, शांत मिनु तर गुरुची हटके मँगो डॉली... अन प्यार वाली लव स्टोरी मधील एकदम रांगडी, बिनधास्त, डॅशिंग नंदीनी अशा अनेक विविधांगी भुमिकांमधुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी 

व्हायच होत डान्सर.... झाले अ‍ॅक्टर
Published: 29 Apr 2016 01:05 PM  Updated: 29 Apr 2016 01:05 PM


             दुनियादारीतील सोज्वळ, लाजरीबुजरी, शांत मिनु तर गुरुची हटके मँगो डॉली... अन प्यार वाली लव स्टोरी मधील एकदम रांगडी, बिनधास्त, डॅशिंग नंदीनी अशा अनेक विविधांगी भुमिकांमधुन प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारी अन घराघरात पोहचलेली अभिनेत्री म्हणजे उर्मिला कोठारे. उर्मिलाने आजपर्यंत अनेक हिंदी मराठी मालिकांमधुन स्वत:च्या अभिनयाची छाप उमटविली आहे तर मराठी इंडस्ट्रीमध्ये स्वत:चे भक्कम स्थान निर्माण केल आहे. उर्मिलाचा करिअर प्रवास, तिच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना, मेमोरेबल इन्सिडन्स, अन चाहत्यांचे मिळालेले प्रेम अशा अनेक गोष्टी तिने सेलिब्रिटी रिपोर्टरच्या माध्यामातून सीएनएक्स सोबत शेअर केल्या आहेत.
             मला सुरुवाती पासुनच डान्स मध्ये इंटरेस्ट होता. मी कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण देखील घेत होत. मग एकदा असच अगदी सहजच मी एका सिरिअलच्या आॅडिशनसाठी गेले. मला फक्त ती आॅडीशन द्यायची होती. सिलेक्ट झाले तर आनंदच अन नाही झाले तरी मला अजिबातच फरक पडणार नव्हता. पहिल्यांदा कॅमेरा फेस करणार याची भीती वगैरे अजिबातच नाही वाटली. मी खुपच कम्फर्टेबल होते मग मला एक सीन देण्यात आला तो मी व्यवस्थित केला अन मला त्या सिरिअलसाठी सिलेक्ट करण्यात आले. माझ्यासाठी खरच हे एकप्रकारचे सरप्राईजच होते. मी मजेमध्ये आॅडिशन द्यायला गले अन सक्सेस झाले. अशा प्रकारे मी डान्सर होता होता नकळतपणे अ‍ॅक्टर झाले.

            

              दुनियादारी हा माझ्या आयुष्यातील फारच महत्वाचा सिनेमा होता. या चित्रपटाच्या निमित्ताने मी पहिल्यांदा अ‍ॅक्टींग वर्कशॉप केले होते. दुनियादारीसाठी आमचे हे वर्कशॉप संजय मोने यांनी घेतले होते. खरतर आम्ही सर्व कलाकार एकमेकांच्या सोबत काम करताना कम्फर्टेबल आसावेत यासाठीच हे वर्कशॉप घेण्यात आले होते. मला याचा जास्त फायदा झाला कारण मी अंकुश, स्वप्निल,सई,सुशांत,जितेंद्र या सर्वांसोबतच पहिल्यांदा काम करीत होते. या वर्कशॉप दरमम्यान आमच्यातील बाँडिंग अधिक घट्ट होत गेली. अन आज आम्ही सर्वजण एकमेकांचे चांगले फ्रेन्ड्स आहोत. 

                   

          काकण हा चित्रपट माझ्या फारच जवळचा आहे. यामध्ये मी साकारलेली इंदुमतीची भुमिका मला खुपच भावली अन तो रोल माझा फेवरेट आहे. या रोलचे संपुर्ण श्र्रेय मी क्रांतीला देऊ ईश्चिते. कारण तीनेच त्या भुमिकेचे रेखाटन केले होते. मला आत्ताच दिग्दर्शनात पदार्पण करायचे नाही कारण मला अजुन टेक्निकली गोष्टींची तेवढी माहिती किंवा अभ्यास नाही. जर पुढे वाटलेच अन चान्स आलाच तर मी दिग्दर्शनाचा विचार करीन. परंतू आत्ता तरी मला माझ्या सर्वच दिग्दर्शकांना अगदी मनापासुन थँक्स म्हणायचे आहे. कारण त्यांनी माझ्यासाठी केलेले डिरेक्शन अन चांगले चित्रपट यामुळेच मी आज इथपर्यंत पोहचु शकले अन तमाम चाहत्यांचे प्रेम मिळवू शकले आहे.
.....................................................................................
       :- दुनियादारीच्या सेटवर भरला दंड
          दुनियादारी या चित्रपटाच्या अनेक आठवणी आमच्याकडे आहेत. सेटवर स्वच्छता रहावी किंवा थोडा डिसिप्लीनमध्ये काम व्हाव यासाठी काही नियम करण्यात आले होते. सेटवर कचरा करायचा नाही, मोबाईल बंद असावेत अस बरच काही. कोणी कचरा केला तर त्याला १० रुपये दंड असायचा अन त्यावर जर कोणी वाद घातलाच तर मग त्या दंडाची रक्कम १० ची ५० अन पन्नासची शंभर व्हायची. फ्रुट्स खाताना जरी एखादी बी पडली अन कचरा झाला तरी गुपचुप दंड भरावा लागे. अन मग या चित्रपटाचे  शुटिंग संपेपर्यंत माझ्याकडुन २ ते ३ हजार दंड नक्कीच वसुल झाला होता. 

                  

.........................................................................................

  :- फोटो ठेवायचाय देवाºयात
             मला एके दिवशी अचानक एक बाई येऊन भेटल्या अन म्हणाल्या मॅडम मला तुमचा फोटो मिळेल का. मी म्हणाले कशासाठी तर त्यांनी सांगितले मला तुमचा फोटो माझ्या देवाºयात ठेवायचाय. ते ऐकुन मला एकदम धस्स झाले अन मी विचारले असे का. तर त्या म्हणाल्या तुमच्या चेहºयावर पॉझिटीव्हीटी आहे. मला तुमच्याकडे पाहुन अगदी प्रसन्न वाटते. मी तुमचा फोटो माझ्या देवाºयात ठेवीन म्हणजे रोज तुमच्याकडे पाहिल्यावर माझा दिवस चांगला जाईल. त्यांचे हे बोलणे माझ्यासाठी शॉकिंग होते अन मी तो अनुभव कधीच विसरु नाही  शकणार.
  .........................................................................

    :-  कोठारेंचे नॉनव्हेज फेमस 
             सुदैवाने मी लग्नानंतर अशा घरात गेले जी फॅमिली मला नेहमी सपोर्ट करते. मी जेव्हा घरी असते तेव्हा काम करतेच. अन जेवण म्हणाल तर कोठारेंकडे नॉनव्हेज फेमस आहे. मला देखील खायला आवडायचे परंतू नंतर माझ्या लक्षात आले मी एका टाईम नंतर सतत नॉनव्हेज नाही खाऊ शकत. मला माझी चिंच गुळातील आमटी अन भाजीच आवडते.  माझ्यामुळे माझ्या सासुबाई सुद्धा माझ्या पद्धतीच्या भाज्या करायला शिकल्या. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :