आदिनाथ-उर्मिलाचा मराठमोळा कपल डान्स

  डान्स करायला कोणाला आवडत नाही हो. कानावर डिजे ची गाणी पडली कि आपोआपच पाय थिरकायला लागतात अन नाचायची झिंग मग हळूहळू चढु लागते. वेड्यासारखे 

आदिनाथ-उर्मिलाचा मराठमोळा कपल डान्स
Published: 20 Apr 2016 04:31 PM  Updated: 20 Apr 2016 04:31 PM


         डान्स करायला कोणाला आवडत नाही हो. कानावर डिजे ची गाणी पडली कि आपोआपच पाय थिरकायला लागतात अन नाचायची झिंग मग हळूहळू चढु लागते. वेड्यासारखे सैराट होऊन डान्स करणारे अनेक जण आपण पाहतो. काहीजणांना डीजेच्या तालावर नाचायला आवडते तर काहीजणांना मस्त रोमँटीक कपल डान्स करायला आवडतो. मग अशी डान्स करण्याची झिंग आपल्या कलाकारांना चढली नाही तर नवलच. आता पहा ना मराठी इंडस्ट्रीतील रामँटिक कपल आदिनाथ अन उर्मिला कोठारे या दोघांनाही डान्स करायला आवडतोच. उर्मिलाच्या डान्सिंग अदा तर आपण अनेक चित्रपटातील गाण्यांमध्ये पाहिल्याच आहेत. आता हे दोघे कपल डान्स करीत आहेत. तुम्ही म्हणाल कपल डान्स तर करतायत ना मग यात काय नवीन आहे. तर त्याचे झाले असे की, हा कपल डान्स जरा हटकेच आहे. वेस्टर्न आऊटफिटमध्ये नाही तर चक्क मराठमोळ््या अंदाजात या दोघांनी कपल डान्स केला आहे. उर्मिलाने कपाळी चंद्रकोर, नाकात नथ, हातात हिरवा चुडा, कानात झुमके तर आदिनाथने शेरवानी अन डोक्याला फेटा अशा अस्सल गावरान लुकमध्ये हा वेस्टर्न तडक्याचा मराठमोळा कपल डान्स केलाय. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :