नवीन वर्षाचा संकल्प

याही वर्षी मराठी कलाकार करणार जोमाने काम<br /> मराठी चित्रपट कलाकार यावर्षी नव्या जोमाने कामाला लागले आहे. यावर्षीचा त्यांचा काय संकल्प आहे, ते यानिमित्ताने सांगताहेत...<br />  

नवीन वर्षाचा संकल्प
Published: 16 Jan 2016 06:37 AM  Updated: 04 Feb 2016 11:10 AM

कामाच्या व्यस्ततेमुळे कुटुंबाला वेळ देता येत नाही. त्यामुळे काहीसा त्यांच्याबरोबर क्वालिटी टाईम घालविणार आहे आणि स्वत:ला रिफ्रेश करण्यासाठी काही नवीन प्रोजेक्टवर काम करणार आहे. नववर्षाच्या निमित्ताने प्रेक्षकांनाही काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न आहे.
- समीर धर्माधिकारी म्युझिक अँकॅडमी सुरू करणार
नवे वर्ष माझ्यासाठी नेहमीच उत्साह, आनंद घेऊन येणारा असतो. येत्या वर्षात मी माझी म्युझिक अकॅडमी सुरु करण्याचा विचार करत आहे तसच चॅरिटी दवाखाना सुरु करणार आहे जेणेकरून माझा मेडिकलचा अभ्यास सुरूराहील. नवीन वर्षामध्ये प्रदर्शित होत असलेल्या 'फोटोकॉपी' या सिनेमाला घवघवीत यश मिळेल ही आशा करते.
- नेहा राजपाल, गायिका नवी भाषा शिकण्याची इच्छा
पर्यावरणाचे संवर्धन करण्याबरोबरच प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. तसेच बरीच नवीन पुस्तके वाचायची आहेत.. नवीन भाषा शिकण्याचीही इच्छा आहे. आश्‍चर्य वाटेल पण एखादा खेळ खेळण्यावर देखील भर देणार आहे. पण तो खेळ कुठला हे अद्याप तरी निश्‍चित केलेले नाही.
- सुयश टिळक परिसर स्वच्छ ठेवणार
न्यू इयर रिजोल्यूशन शक्यतो मी करत नाही. इट्स अनदर डे फॉर मी. आयुष्यात आपण बर्‍याच गोष्टी ठरवतो, त्या होतातच असं नाही. त्यामुळे रिजोल्यूशनपेक्षा मी संकल्प टप्पाटप्याने करणं पसंत करते. संकल्प करायचा झालाच तर सध्याची परिस्थिती पाहता मी पाणी बचत आणि निदान माझ्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन.
- अदिती भागवत, अभिनेत्री पाणी बचत करणार
'गुरू' च्या माध्यमातून माझी प्रेस्टिजियस जर्नी सुरूहोईल. त्यामुळे वर्षाची सुरुवात खूप स्पेशल होणार आहे. मी आणि आदिनाथ काही कामानिमित्त मराठवाड्यात गेलो असताना तिकडे दुष्काळाची परिस्थिती पाहिली आणि धक्काच बसला. म्हणूनच मी व्यक्तिगतरीत्या संकल्प केलाय, शक्य होईल तितकी पाण्याची बचत करायची.
- ऊर्मिला कानेटकर-कोठारे कामाबरोबरच तब्येतही जपणार
नवीन वर्ष माझ्यासाठी खूप बिझी असणार आहे. एक अभिनेत्री म्हणून माझा अभिनय अधिक सकस आणि प्रभावशाली होईल याकडे लक्ष देणार आहे. तसेच नवीन वर्षात मी काही सिनेमेदेखील साइन केले आहेत, त्यामुळे येत्या वर्षात मला भरपूर काम असून त्यासाठी माझी खूप धावपळ होणार आहे, म्हणूनच कामाबरोबरच मी माझ्या तब्येतीकडे देखील जास्त लक्ष देणार आहे, माझ्या कामाचा ताण माझ्या आरोग्यावर पडू न देण्याचा माझा संकल्प असणार आहे.
- पूजा सावंत, अभिनेत्री प्रत्येक वर्षी डायरी लिहिण्यावर भर
न्यू इअर रिजोल्यूशन करण्यापेक्षा प्रत्येक वर्षी एक डायरी लिहिणं पसंत करते. ज्यामध्ये येत्या वर्षात मला करायच्या असलेल्या १0 गोष्टी नमूद करते आणि त्या कशा पूर्ण होतील यावर लक्ष्य केंद्रित करते. त्यातील काही पूर्ण होतात तर काही होत नाही. त्यामुळे माझं मलाच कळून येते, की नेमकी मेहनत कुठे करायची आहे.  नेहमीच माझी नवीन वर्षाची सुरुवात स्पेशल करतो. त्यामुळे नवीन वर्षासाठी मी नेहमीच एक्साईट असते. - प्रार्थना बेहरे, अभिनेत्री चांगला माणूस होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण
नवीन वर्षाचे संकल्प करण्यापेक्षा आपण आपले काम प्रामाणिकपणे करीत राहायचे, तर त्या कामांची पूर्तताही होतेच. आपल्या हातून जर काही चुका झाल्या असतील तर त्या सुधारायचा प्रयत्न करायचा. चांगला माणूस होण्याच्या दृष्टीने मार्गक्रमण करीत राहायचे. त्यामुळे वेगळा संकल्प करण्यावर माझा फारसा विश्‍वास नाही. - केदार शिंदे, दिग्दर्शक नाटकांचे भरपूर प्रयोग करणे
नवीन वर्ष आले की संकल्प केले जातात आणि ते पूर्ण होण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्नही केले जातात. पण ते प्रत्यक्षात उतरतातच असे नाही. तरीही संकल्प केल्यामुळे त्या गोष्टीवर किमान लक्ष्य केंद्रित तरी होते. यंदा 150 किमी सायकलिंग करणे आणि नाटकाचे भरपूर प्रयोग करणे. आता पाहूया त्याची पूर्तता कशी होते.
- उमेश कामत नवे वर्ष आले म्हटल्यावर सेलिब्रेशन आणि रिजोल्यूशन (संकल्प) देखील ओघाने आलेच! सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सर्वांनी काहीना काहीतरी प्लॅन्स केले असतील आणि त्याच्या बरोबरीने नवीन वर्षामध्ये काय करायचे याचा संकल्पही केला असेल.. याला सेलिब्रिटिज देखील अपवाद ठरणारे नाहीत. रिजोल्यूशन हे पूर्ण होतातच असे नाही.. पण तरीही ते केले जातातच! नवीन वर्षामध्ये असेच काही केलेले संकल्प सेलिब्रिटिज 'सीएनएक्स' समवेत शेअर करीत आहेत. मोकळेपणाने नवीन वर्षाचे स्वागत करणे
नवीन वर्षाचा असा एखादा संकल्प करण्यावर माझा विशेष भर नाही. कोणतीतरी गोष्ट पूर्ण करण्याच्या प्रेशरखाली का नवीन वर्षाला सुरुवात करायची? मनमोकळेपणाने नवीन वर्षाची सुरुवात करण्यावर माझा विश्‍वास आहे.
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :