तेजश्रीला ओढ लागली मातृभूमीची !

'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या अमेरिकेमध्ये आहे. 'कार्टी काळजात घुसली' या नाटकाच्या प्रयोगासाठी गेली कित्येक दिवस ती अमेरिकेतच आहे. त्यामुळे तिला पुन्हा मायदेशी परतायचे वेध लागले आहेत

तेजश्रीला  ओढ लागली  मातृभूमीची !
Published: 28 Sep 2016 01:11 PM  Updated: 28 Sep 2016 01:21 PM

'होणार सून मी या घरची' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान ही सध्या अमेरिकेमध्ये आहे. 'कार्टी काळजात घुसली' या नाटकाच्या प्रयोगासाठी गेली कित्येक दिवस ती अमेरिकेतच आहे. त्यामुळे तिला पुन्हा मायदेशी परतायचे वेध लागले आहेत. विशेष म्हणजे अमेरिकेत तिच्या या नाटकाचे प्रयोगदेखील हाऊसफुल जात आहेत. अमेरिकेत इतकं भरभरून प्रेम मिळत असूनही ही तेजश्रीला आपल्या मातृभूमीचे आेढ लागलेली दिसतेय.तिच्या सोशलमीडियावरील स्टेटसवरून या गोष्टीचा उलगडा झालाय. नुकतेच तेजश्रीने सोशलमीडियावर चालतानाचा एक फोटो अपलोड केला आहे. या फोटोखाली तिने मी भारतात येण्यासाठी खूप उतावळी झाली असल्याचे लिहिले आहे. तिच्या या स्टेटसला तिच्या चाहत्यांनीदेखील भरभरून प्रतिसाद दिला आहे. 'कम फास्ट तेजू' म्हणत एका चाहत्यांने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.




 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :