सातासमुद्रापार सेटल !

आपल्या जोडीदारासह परदेशात स्थायिक होणा-या बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. यांत मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. मराठमोळ्या अभिनेत्रींसुद्धा आता लग्न करुन परदेशातच स्थायिक होऊ लागल्यात.

सातासमुद्रापार सेटल !
Published: 17 Sep 2016 05:44 PM  Updated: 17 Sep 2016 05:44 PM

सुवर्णा जैन, सिएनएक्स लोकमत, मुंबई

सातासमुद्रापार सेटल !


 
आपल्या जोडीदारासह परदेशात स्थायिक होणा-या बॉलिवुडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत. यांत मराठी चित्रपटसृष्टीच्या अभिनेत्रीसुद्धा मागे नाहीत. मराठमोळ्या अभिनेत्रींसुद्धा आता लग्न करुन तिथेच स्थायिक होऊ लागल्यात.यांत सगळ्यात पहिलं नाव येतं मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे यांचं. मराठी आणि हिंदी सिनेमात अश्विनी भावे यांनी विविधरंगी भूमिका आपल्या अभिनयाने गाजवल्या. त्यानंतर अश्विनी भावे यांनी सॉफ्टवेअर इंजीनिअर किशोर बोपर्डीकर यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर अश्विनी भावे पतीसह अमेरिकेतील सॅन फ्रॅन्सिस्को इथं स्थायिक झाल्या. लग्न झाल्यापासून अश्विनी भावे यांनी सिनेमात काम करणं कमी केलं होतं. तरी 2007 साली त्यांनी निर्माती म्हणून नवी इनिंग सुरु केली. 



 
 
अश्विनी भावे यांच्याप्रमाणेच आणखी एक मराठमोळी मुलगी परदेशी व्यक्तीवर लट्टू झाली आणि त्यानंतर परदेशात स्थायिक झाली. मूळची पुण्याची असलेली राधिका  आपटे 2012 साली ब्रिटीश संगीतकार बेनेडिक्ट टेलरसह रेशीमगाठीत अडकली. 2011 साली दोघांची लंडनमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान भेट झाली. भेटीचं रुपांतर आधी मैत्रीत आणि त्यानंतर वर्षभर दोघंही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. लग्नानंतर राधिका आता लंडनमध्येच स्थायिक झालीय. 
 



 
याच यादीत आता आणखी एका मराठमोळ्या नावाची भर पडतेय. प्रसिद्ध मॉडेल, फेमिना मिस इंडिया, मिस अर्थ 2006 विजेती आणि अभिनेत्री अमृता पत्कीसुद्धा आता परदेशात स्थायिक होणार आहे. अमृता आता सिंगापूरमध्ये स्थायिक होणार आहे. 



मराठमोळी अभिनेत्री माधुरी दीक्षित-नेनेसुद्धा लग्नानंतर काही काळ परदेशात स्थायिक झाली होती. डॉक्टर श्रीराम नेने यांच्याशी लग्नबंधनात अडकल्यानंतर कुटुंब आणि संसारावर लक्ष देण्यासाठी धकधक गर्ल माधुरीने परदेशात पतीसह राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र सिनेमाशी असलेल्या अतूट नात्यामुळं माधुरी फार काळ स्वतःला बॉलिवुडपासून दूर ठेवू शकली नाही. त्यामुळे माधुरी पुन्हा स्वदेशी परतली. 
 
 
 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :