​अमृता देणार विज्ञानाचे धडे

ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवणारी तसेच २००६च्या मिस इंडियाची मानकरी ठरलेली अमृता पत्की सध्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देतेय. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाटावी यासाठी हसत-खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधते आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा अमृताचा हा प्रयत्न आपल्या आगामी ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमासाठी आहे

​अमृता देणार विज्ञानाचे धडे
Published: 14 Sep 2016 03:23 PM  Updated: 14 Sep 2016 03:23 PM


 
ग्लॅमर विश्वात आपला ठसा उमटवणारी तसेच २००६च्या मिस इंडियाची मानकरी ठरलेली अमृता पत्की सध्या विद्यार्थ्यांना विज्ञानाचे धडे देतेय. विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी वाटावी यासाठी हसत-खेळत विद्यार्थ्यांशी संवाद साधते आहे. विद्यार्थ्यांच्या मनाचा कौल जाणून घेण्याचा अमृताचा हा प्रयत्न आपल्या आगामी ‘कौल मनाचा’ या मराठी सिनेमासाठी आहे 
ग्लॅमरस अमृता पत्की आपल्या या भूमिकेबद्दल सांगते की, चित्रपटातील माझ्या भूमिकेला खूप वेगळी शेड आहे. विद्यार्थ्यांचा कल जाणून घेत त्यांच्याशी उत्तम समन्वय साधणाऱ्या शिक्षिकेची ही भूमिका आहे. किशोरवयीन मुलांना अनेक गोष्टींच कुतूहल असतं. बऱ्याचदा मोठ्यांकडून या कुतुहलाबद्दल योग्य ती चिकित्सा होत नाही. त्यामुळे आपल्या मनातील कुतूहलाविषयी जाणून घेण्यासाठी ते अनेकदा चुकीचा मार्ग चोखाळतात. याच विषयावर ‘कौल मनाचा’ या सिनेमात भाष्य करण्यात आलं आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन भिमराव मुडे यांच आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :