सायलीने घेतला उस्ताद गुलाम मुस्ताफा खान साहेब यांचा आशिर्वाद

भारताचे नाव उंचावर पोहोचविणारे उस्ताद गुलाम मुस्ताफा खान साहेब यांची भेट होणे म्हणजे स्वर्गवास मिळाल्यासारखे असल्याचे गायिका सायली पंकज हिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.

सायलीने घेतला उस्ताद गुलाम मुस्ताफा खान साहेब यांचा आशिर्वाद
Published: 17 Aug 2016 03:05 PM  Updated: 17 Aug 2016 04:09 PM

भारताचे नाव उंचावर पोहोचविणारे उस्ताद गुलाम मुस्ताफा खान साहेब यांची भेट होणे म्हणजे स्वर्ग मिळाल्यासारखे असल्याचे गायिका सायली पंकज हिने लोकमत सीएनएक्सशी बोलताना सांगितले.  सायली म्हणाली, खान साहेब यांनी पद्मश्री, पद्मभूषण यांसारखे पुरस्कार प्राप्त केले आहे. अशा या ग्रेट आर्टिस्टबरोबर गाणं गाण्यास मिळणे म्हणजे करिअरला चार चाँद लागण्यासारखे आहे. त्यांच्यासोबत नुकतेच स्वातंत्र्यदिनानिमित्त जन-गण-मन हे राष्ट्रगीत गाण्याचा मान मिळाला. हे राष्ट्रगीत अकरा ओळींचे आहे. यामध्ये त्यांची मुलं, मी आणि त्यांचा शिष्य वर्ग आम्ही सर्वानी मिळून हे गाणं रेकॉर्ड केले आहे.  गुरूजींची ही भेट पंकजमुळेच जमवून आली आहे. पंकजचे गुरूजींच्या परिवाराशी खूप छान नाते आहे. तसेच  हे गाणं ज्यावेळी सोशलमिडीयावर प्रदर्शित करण्यात आले. त्यावेळी फार कमी कालावधीत दोन हजार लोकांनी हे गाणं शेअर केले आहे. यामध्ये बॉलिवुडचे तगडे गायक सोनू निगम, हरिहरन, शान या उस्तादजींच्या  शिष्यांचा  समावेश आहे.

हाफ गर्लफ्रेंड हिंदी मीडियमवर भारी पडेल असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :