​अजय देवगण दिसणार या मराठी चित्रपटात

​अजय देवगण आता प्रेक्षकांना मराठी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अजय देवगण प्रोडक्शनच्या आगामी मराठी चित्रपटात नाना पाटेकर, सुमीत राघवन आणि इरावती हर्षे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अजय काम करणार असल्याचे कळतेय.

​अजय देवगण दिसणार या मराठी चित्रपटात
Published: 13 Jul 2017 01:19 PM  Updated: 13 Jul 2017 01:19 PM

अजय देवगणने एक अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आपले एक प्रस्थ निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षांपासून तो अभिनयासोबतच निर्मितीक्षेत्राकडे देखील वळला आहे. हिंदीसोबतच तो प्रादेशिक भाषेतील चित्रपटांची देखील निर्मिती करत आहे. 
अजय देवगण प्रोडक्शनने आतापर्यंत अतिशय चांगले चित्रपट देण्याचा प्रयत्न केला आहे. आशयघन विषयावरील चित्रपटाची निर्मिती करण्याकडे त्यांचा कल असतो. सध्या मराठी चित्रपटसृष्टीला खूप चांगले दिवस आले आहेत. अनेक चांगल्या विषयांवरचे चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. आता आणखी एक वेगळ्या धाटणीचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण प्रोडक्शन करत आहे. या चित्रपटात नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असून सतिश राजवाडे या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहे. 
अजय देवगणच्या फॅन्ससाठी एक खूप चांगली बातमी आहे. अजय देवगणची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अजय देवगण प्रेक्षकांना पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 
अजयची पत्नी काजोलची आई तनुजा या मराठी असल्याने काजोल खूपच छान मराठी बोलते. त्यामुळे या चित्रपटासाठीदेखील अजय काजोलकडून मराठीचे धडे गिरवणार आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.
या चित्रपटात नाना पाटेकर यांच्यासोबतच इरावती हर्षे आणि सुमीत राघवन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची निर्मिती अजय देवगण प्रोडक्शन, अभिनव शुक्ला आणि मनिष मिश्रा यांचे वॉटरगेट प्रोडक्शन मिळून करणार आहे तर या चित्रपटाचे सहनिर्माते नाना पाटेकर आहेत. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून या चित्रपटाच्या मुहूर्ताला काजोल उपस्थित होती. 

Also Read : काजोलने क्लॅप वाजवून अजय देवगणच्या नव्या मराठी चित्रपटाचा केला प्रारंभ!


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :