​अगडबम फेम तृप्ती भोईर संगीतकार टी सतीश चक्रवर्ती यांच्यासोबत अडकली विवाहबंधनात

​अगडबम फेम तृप्ती भोईरने दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध संगीतकार टी सतीश चक्रवर्तीसोबत लग्न केले.

​अगडबम फेम तृप्ती भोईर संगीतकार टी सतीश चक्रवर्ती यांच्यासोबत अडकली विवाहबंधनात
Published: 17 Jul 2017 03:54 PM  Updated: 17 Jul 2017 03:54 PM

मराठी इंडस्ट्री आणि छोट्या पडद्यावर सध्या लग्नाचा मोसम आहे असे म्हटले तर चे चुकीचे ठरणार नाही. अनेक कलाकार सध्या लग्नबंधनात अडकताना दिसत आहेत. या कलाकारांच्या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे.
अगडबम या चित्रपटामुळे नावारूपाला आलेल्या अभिनेत्री तृप्ती भोईरने नुकतेच लग्न केले. दाक्षिणात्य संगीतकार टी सतीश चक्रवर्ती यांच्यासोबत ती लग्नबंधनात अकडली. तृप्तीचे लग्न चेन्नईमधील मेना हॉलमध्ये गाजतवाजत झाले. टी सतीश चक्रवर्ती हे दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अतिशय नावाजलेले संगीतकार आहेत. लीलाई आणि कनिमोझी या चित्रपटातील त्यांची गाणी खूप गाजलेली आहेत. 2006 पासून ते प्रसिद्ध गायक ए.आर.रहमान यांच्यासोबत काम करत आहेत.
तृप्तीने कॉलेजजीवनापासूनच तिच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. तिने कॉलेज जीवनात अभिनयासाठी अनेक पुरस्कार मिळवले आहेत. तसेच तिने नृत्याचे शिक्षण देखील घेतले आहे. कॉलेजमध्ये असताना राष्ट्रीय स्तरावर अनेक पुरस्कार मिळाल्यानंतर ती नाटकांकडे वळली. सही रे सही या नाटकातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले तर त्यानंतर तिने ओवाळते भाऊराया, तुझ्या माझ्या संसाराला आणि पाऊलखुणा यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. अगडबम या चित्रपटात अतिशय जाड्या मुलीची तिने भूमिका साकारली होती. या तिच्या भूमिकेची चांगलीच चर्चा झाली होती. तसेच टुरिंग टॉकीज या तिच्या चित्रपटालादेखील चांगलेच यश मिळाले होते. तिने चित्रपटांप्रमाणेच वादळवाट, चार दिवस सासूचे या मालिकांमध्ये काम केले आहे. 
हॅलो जय हिंद या तिने निर्मिती केलेल्या चित्रपटात दक्षिणेतील प्रसिद्ध गायक इलायराजा यांनी गाणे गायले होते. 

Also Read : दिल दोस्ती दुनियादारी फेम अमेय वाघ अडकला लग्नबंधनात


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :