पडद्यामागील ‘आम्ही दोघी’ दिग्दर्शिका प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव

प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांचा ‘आम्ही दोघी’ चित्रपट पडद्यावर पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांची आगळी जुगलबंदी पडद्यावर दिसणार आहे आणि त्यातून चित्रपट खुलणार आहे.

पडद्यामागील ‘आम्ही दोघी’ दिग्दर्शिका प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव
Published: 23 Feb 2018 09:39 AM  Updated: 23 Feb 2018 09:39 AM

२३ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणारा प्रिया बापट आणि मुक्ता बर्वे यांचा  ‘आम्ही दोघी’ चित्रपट  पडद्यावर पाहायला प्रेक्षक उत्सुक आहेत. त्यांची आगळी जुगलबंदी पडद्यावर दिसणार आहे आणि त्यातून चित्रपट खुलणार आहे. पडद्यावरील या दोघींबरोबरच पडद्यामागिल “आम्ही दोघी’ ज्यांनी या चित्रपटाचा गाभा निर्माण केला आहे. त्या आहेत चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रतिमा जोशी आणि संवाद लेखिका भाग्यश्री जाधव.  

गौरी देशपांडेच्या कथेवर आधारित ‘आम्ही दोघी’ चित्रपट ज्यावेळी करायचे ठरवले त्यावेळी मी आणि भाग्यश्रीने बरेच ड्राफ्ट बनवले. ८ ते ९ महिन्यानंतर एक फायनल ड्राफ्ट तयार झाला. हा ड्राफ्ट घेऊन आम्ही एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया यांच्या कडे गेलो. या चित्रपटाची कथा ऐकल्यावर संजय छाब्रिया यांनी चित्रपट करण्यासाठी लगेच होकार दिला. ‘आम्ही दोघी’ हा चित्रपटाच्या मुख्य भूमिकेसाठी माझ्या डोळ्यासमोर मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांचेच चेहरे होते. आणि त्यांना घेऊनच मला हा चित्रपट बनवायचा होता. या चित्रपटाची कथा मी आणि भाग्यश्री ने मुक्ता व प्रिया यांना ऐकवली  व त्याने पण लगेच होकार दिला आणि म्हण्याला कधी शूटिंग सुरु करायचे आणि मग पुढे किरण करमरकर, भूषण प्रधान, आरती वडगबालकर आणि प्रसाद बर्वे हे पण या चित्रपटात सामील झाले असे चित्रपटाची दिग्दर्शिका प्रतिमा जोशी म्हणाल्या.  

गौरी देशपांडे यांच्या लिखाणावर बेतलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते, असे त्यांनी म्हटले आहे. “मी फार पूर्वीच ठरविले होते की जेव्हा केव्हा मी स्वतः चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा तो गौरी देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित असेल,” आम्ही दोघी’ चित्रपट करणे हे माझे स्वप्न होते आणि आता या चित्रपटातून ते प्रत्यक्षात साकार झाले आहे.  

भाग्यश्री जाधव या मराठीतील आघाडीच्या कॉस्च्युम डिझायनर आहे. त्यांनी प्रतिमा जोशी यांच्याबरोबर‘वाडा चिरेबंदी’साठी महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्तम कॉस्चुम डिझायनरचा पुरस्कार पटकावला आहे. आम्ही दोघीचे लिखाण करताना एक लेखक म्हणून खूप मजा आली, असे त्या म्हणतात. “मुळात कथाच खूप अर्थगर्भ आणि काळाच्या दोन पावले पुढे जाणारी आहे. ती एवढी परिपूर्ण आहे की त्या पायावर कळस चढवणे हे कोणत्याही लेखकासाठी एक आव्हान होते. चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिताना त्यामुळेच मजा आली,” त्या म्हणतात.  

आम्ही दोघीमधील दोन्ही व्यक्तिरेखा मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी सशक्तपणे साकारल्या आहेत. या चित्रपटात  सावीची व्यक्तिरेखा त्यांनी एवढ्या दमदारपणे लिहिले आहे की साकारताना एक अभिनेत्री म्हणून कस लागतो. सावी जितकी फटकळ, तुसडी आणि स्पष्टवक्ती आहे तितकीच ती खरी आहे. तिचे हे खरेपणच मला अधिक भावते. उत्तमरित्या लिहिलेल्या या व्यक्तिरेखेचा १५ वर्षांचा काळ आणि त्यातील तीन टप्पे उभे करणे हे एक सर्वात मोठे चॅलेंज होते,” प्रिया म्हणते.   

मुकता बर्वे म्हणाली की, अमलाची यातील भूमिका साकारताना तिला खूप मजा आली. “मी आज पर्यंत मी खूप  बोल्ड, विद्रोही व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, पण अम्मी ही एक वेगळी व्यक्तिरेखा माझ्या वाट्याला या चित्रपटात आली आहे.  या चित्रपटात साविच्या तोंडी एक वाक्य आहे की, ‘सावी नेहमी फोरग्राउंडवर आणि अमला नेहमी ब्याग ग्राउंडवर आणि आमच्या या दोन्ही व्यक्तिरेखा आम्ही तशाच साकारल्या आहेत.   

‘आम्ही दोघी’ ची कथा तरलतेने आणि सेन्सिटीव्हीटी राखत पुढे सरकते आणि तेच या चित्रपटाचे आणि दिग्दर्शिका प्रतिमा जोशी आणि संवाद लेखिका भाग्यश्री जाधव यांचे  वैशिष्ट्य आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :