म्हणून फराह खानने मराठी सिनेमा 'हृदयांतर'साठी कोरियोग्राफ केलं हे गाणं?

माझी दिवसाची सुरुवात ही माझ्या मुलींपासूनच होत असते. त्यांच्यासाठी मी अशीच मागे मागे पळत असते.

म्हणून फराह खानने मराठी सिनेमा  'हृदयांतर'साठी कोरियोग्राफ केलं हे गाणं?
Published: 19 Jun 2017 11:20 AM  Updated: 21 Jul 2017 03:23 PM

प्रसिद्ध डिझायनर विक्रम फडणीस दिग्दर्शक म्हणून नवी इनिंग सुरु करतोय हे एव्हाना सा-यांनाच माहित झालंय. त्याने दिग्दर्शित केलेला हृदयांतर हा सिनेमा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक हे गाणं सध्या बरंच गाजत आहे. जान्हवी प्रभू-अरोरा आणि राशी सलील हरमळकर यांनी गायलेले हे गाणं फराह खान यांनी कोरियोग्राफ केलं आहे. याच निमित्ताने फराह खान यांच्याशी साधलेला हा खास संवाद.

'पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक' या गाण्याची सध्या खूप चर्चा सुरु आहे. हे गाणं तुम्ही कोरियोग्राफ केले आहे. मराठी सिनेमातील गाणं कोरियोग्राफ करण्याचा योग कसा जुळून आला ?

मराठीमध्ये 'चल रे भोपळ्या टुणूक टुणूक' असं काही आहे हे मलाच माहित नव्हते. मात्र विक्रमने मला सांगितले की ही एक मजेशीर कविता आहे. या कवितेवर एक छान गाणं बनवतोय आणि ते तुलाच कोरियोग्राफ करायचे आहे असं विक्रमने मला सांगितले. शेवटी मित्राला नाही बोलायचा प्रश्नच नव्हता. त्यामुळे सगळे जुळून आलं आणि एका दिवसांत हे गाणे कोरियोग्राफ झाले. 

हे गाणं कोरियोग्राफ करण्याचा अनुभव कसा होता ?

मुक्ता बर्वे आणि दोन बालकलाकार मुलींसोबत काम करताना खूप मजा आली. या सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने जुळवून घेतलं. सकाळी उठून मुली शाळेत जातात असं रुटीन या गाण्यात दाखवण्यात आले आहे. हे गाणं करत असताना माझ्या मुलींची मला आठवण झाली. कारण माझी दिवसाची सुरुवात ही माझ्या मुलींपासूनच होत असते. त्यांच्यासाठी मी अशीच मागे मागे पळत असते. 

तुमच्या तीन लेकींचा विषय निघालाय तर त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल? कशारितीने त्यांच्याशी तुमची धम्माल मस्ती सुरु असते ?

हल्लीची पीढी खूप स्मार्ट आहे. माझ्या मुलींविषयी काही सांगायलाच नको. सगळ्यात आधी तर त्या खूप नॉन फिल्मी आहे. असं असूनही मी त्यांना डान्स क्लासला पाठवते. त्या बेली डान्स शिकतायत. घरी आल्यावर मग काय त्यांची धम्माल सुरु असते. त्या घरी आल्यावर व्हिडीओ बनवतात आणि सोबतीने मलाही नाचवतात. मुलींसह खूप मस्ती सुरु असते. 

प्रादेशिक सिनेमा विशेषतः मराठी सिनेमा चांगली कामगिरी करत आहेत. तुम्ही हिंदी सिनेमा दिग्दर्शित केले आहेत तर मराठी सिनेमा दिग्दर्शित करण्याची किंवा मराठी सिनेमा निर्मितीची काही योजना आहे का ?

मराठी सिनेमा सध्या चांगली कामगिरी करत आहेत. मराठी सिनेमांना मिळणारं यश खरंच कौतुकास्पद आहे. माझ्यासाठी मराठी सिनेमासाठी काम करण्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी अगं बाई अरेच्चा या सिनेमासाठी काम केलं होतं. या सिनेमात 'छम छम करता है' हे गाणं सोनाली बेंद्रेवर चित्रीत करण्यात आलं होतं. मात्र मराठी सिनेमा दिग्दर्शित करण्याची किंवा मराठी सिनेमाच्या निर्मितीचा सध्या कोणताही प्लान नाही. मराठी भाषा समजते मात्र त्यातील बारकावे माहित नाही. जोवर तुम्हाला एखाद्या गोष्टीमधील बारीक सारीक गोष्टी माहित नसतात तोवर तुम्ही त्यात परफेक्शन देऊ शकत नाहीत असं मला वाटतं. 

यानंतरचे पुढचे प्रोजेक्ट किंवा प्लानिंग विषयी जाणून घ्यायला आवडेल?

सध्या काही दिवस मी भारतात नाही. कामाचा व्याप आणि बिझी शेड्युलमधून वेळ काढत मी सुट्टीवर जात आहे. न्यूयॉर्कमध्ये कुटुंबीयांसोबत ही सुट्टी एन्जॉय करणार आहे. 


पुन्हा फुलणार का सलमान खान आणि कतरिना कैफची लव्हस्टोरी?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :