आई माझी प्रेरणास्थान- सोनाली कुलकर्णी

'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2# या सिनेमात कमा करत तिने बाॅलिवूडमध्ये एंट्री मारली. आता काॅमेडीची बुलेट ट्रेनच्या माध्यमातून तिला हास्यपरी म्हणूनही ओळखली जाते. सोनालीच्या आजवरच्या प्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या खास गप्पा.

आई माझी  प्रेरणास्थान- सोनाली कुलकर्णी
Published: 13 Mar 2017 01:13 PM  Updated: 15 Mar 2017 12:40 AM

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या यशात तिच्या आईचा मोलाचा वाटा आहे .खुद्द सोनालीनेच या गोष्टीचा उलगडा केला आहे.बकुळा नामदेव घोटाळे या पहिल्याच सिनेमासाठी सर्वोक्तृष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार पटकावणारी अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. या यशानंतर सोनालीने मागे वळून पाहिलेच नाही.अप्सरा आली म्हणत आपल्या अदा आणि सौदर्याने तिने रसिकांनाही वेड लावलं. 'क्षणभर विश्रांती','अजिंठा','मितवा' अशा अनके सिनेमांमधून तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.इतकचे नाहीतर 'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' या सिनेमातून तिने बाॅलिवूडमध्येही एंट्री मारली. आता 'काॅमेडीची बुलेट ट्रेन' या कार्यक्रमाच्या माध्यमातून तिला 'हास्यपरी' म्हणूनही ओळखली जाते.सोनालीच्या आजवरच्या प्रवासाविषयी तिच्याशी मारलेल्या खास गप्पा.
 
अभिनय क्षेत्रात येण्यासाठी तुला कुणापासून  प्रेरणा मिळाली?
माझे या क्षेत्रात येण्याचे प्रेरणास्थान म्हणजे माझी आई,खरं म्हणजे माझ्या आईची अभिनेत्री बनण्याची इच्छा होती.आई लष्करात नोकरीला होती.त्यावेळी मी चार महिन्याची पोटात असताना तिने डान्स केला होता.अभिनयाचे,डान्सचे आणि कलेचे गर्भसंस्कार माझ्यावर झाले होते.बालपणापासूनच अभिनयात करियर करण्याची  इच्छा होती.माझ्या आईचे स्वप्न पूर्ण करायचे होते.आज मला विविध सिनेमात काम करत असताना आईचे स्वप्न पूर्ण केल्याचे समाधान मिळते.
 
 
तुला कोणत्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात त्याल जोडून दुसरा प्रश्न महिलांना काॅमेडी जमत नाही असं जे म्हटले जाते याबाबत तुला काय वाटतं?
 
आजवर मी विवध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत.रोमँटीक,काॅमेडी  स्वरूपाच्या भूमिका साकारल्या आहेत.प्रत्येक भूमिका मी तितकीच एन्जॅाय केली आहे.मात्र महिलांना काॅमेडी जमत नाही हे काही मला पटत नाही.कारण,माझे स्पष्ट मत आहे की,असे एकही क्षेत्र नाही जे महिलांना जमत नाही.माझ्या बाबतीत सांगायचे झाले तर काॅमेडी असो किंवा रोमँटीक सगळ्या प्रकारच्या भूमिका मी एन्जॅाय करते.
 
रसिकांनी तुला बाॅलिवूड सिनेमात पाहिलंय त्या अनुभवाविषयी जाणून घ्यायला आवडले?
मराठी रसिकांनी भरभरून प्रेम दिले आहे.त्यांचे प्रेम आणि आशीर्वादामुळेच मराठी चित्रपटसृष्टीत वेगळं स्थान मिळवू शकले.त्याच जोरावर मला बाॅलिवूडची संधी मिळाली.'ग्रँड मस्ती' आणि 'सिंघम 2' या सिनेमात बाॅलिवूडच्या दिग्गज कलाकारांसह काम करण्याची संधी लाभली.या दोन्ही  सिनेमात माझ्या भूमिका तुलनेने छोट्या होत्या.तरी सुध्दा त्या मी आनंदाने  स्विकारल्या आणि रसिकांनाही त्या आवडल्या हा अनुभवसुध्दा बरेच काही शिकवणारा होता.


तुझ्या आगामी सिनेमाविषयी जाणून घ्यायला आवडेल?
 
पहिल्यांदाच मी आणि सुबोध भावे रूपेरी पडद्यावर एकत्र झळकणार आहोत. येत्या जूनमध्ये हा सिनेमा रसिकाच्या भेटीला येणार आहे. सध्या सिनेमाचे नाव ठरलेले नसून लवकरच सिनेमाची घोषणा करण्यात येणार आहे. आजच्या काळातली रोमँटीक कथेवर सिनेमा आधारित असून डॉ.स्वप्ना वाघमारे सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. सुबोध भावेसह काम करण्यात एक वेगळीच मजा येते. या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुबोधसह सिनेमासाठी काम करतेय त्यामुळे खूप आनंद वाटतोय. यासह अनेक पहिल्यांदाच हम्पी इथे जाऊन एक सिनेमा शूट केला आहे.त्यामुळे हम्पीतील नयनरम्य लोकेशन्स सिनेमात पाहायला मिळणार आहेत.आगामी काळात विविध विषयांवर भाष्य करणारे सिनेमातून रसिकांच्या भेटीला येण्याचा मानस आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :