शंभरी अर्धवटरावांची

रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांवर लोकांना भरभरुन प्रेम केले. चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला हसवणाऱ्या अर्धवटराव या बाहुल्यांने नुकतीच शंभरी पार केली. त्यानिमित्ताने शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्याशी लोकमत सीएनएक्सने साधलेला हा खास संवाद.

शंभरी अर्धवटरावांची
Published: 04 Oct 2016 07:13 PM  Updated: 05 Oct 2016 10:42 AM

 बेनझीर जमादार
 
रामदास पाध्ये यांच्या बोलक्या बाहुल्यांवर लोकांना भरभरुन प्रेम केले. चित्रपट, मालिका आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्याला हसवणाऱ्या अर्धवटराव या बहुल्यांने नुकतीच शंभरी पार केली. त्यानिमित्ताने शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांच्याशी लोकमत सीएनएक्सने साधलेला हा खास संवाद. 
 
1. अर्धवटराव या बोलक्या बाहुल्याला शंभर वर्षे पूर्ण झाली आहेत याविषयी काय सांगाल?
- माझे वडील यशवंत पाध्ये यांनी भारतात शब्दभ्रम ही कला आणि बोलक्या बाहुल्यांची संकल्पना रूजविली आहे. वडिलांनी त्या काळात बाहुल्या तयार करून त्यांचे कार्यक्रम केले होते. आज त्यांनी तयार केलेल्या अर्धवटरावांची शंभर वर्षे पूर्ण झाली या गोष्टींचा  मला खूप आनंद आहे. जगभरात आज शंभरी पार करणारे अनेक बाहुले आहेत  पण ते संग्रहालयात आहेत. मात्र अर्धवटराव आजही लोकांचे मनोरंजन करत आहेत.
 
2.  तुमच्या करिअरचा टर्निंग पॉईंट कोणता ?
- लहानपणापासून मी वडिलांजवळ बोलक्या बाहुल्यांचा खेळ शिकत होतो. या खेळाबरोबरच मी माझे मॅकनिकल इंजिनीअरिंगचे शिक्षणदेखील पूर्ण केले. बहुल्यांच्या खेळासाठी मला एकदा अमेरिकेत बोलण्यात आले. तिथे गेल्यावर बाहुल्यांचा खेळ पाहुन माझ्या लक्षात आले या खेळामध्ये करण्यासारखे खूप काही आहे. मग भारतात येऊन मी नोकरी सोडून देऊन या कलेला प्राध्यान्य दिले. तोच माझ्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. 
 
3. अर्धवटरावांच्या फिल्म इंडस्ट्रीतल्या प्रवासाला सुरूवात कशी झाली?
-  काही वर्षांपूर्वी मुंबई दूरदर्शन केंद्रावरून अर्धवटराव आणि आवडाबाई या बाहुल्यांना घेऊन कार्यक्रम सादर केले. यानंतरच्या काही जाहिरातीमध्ये देखील बाहुल्यांची कमाल पाहायला मिळाली. त्यांनतर महेश कोठारेंनी बोलक्या बाहुल्याला चित्रपट घेण्याचे धाडस दाखवले. त्यांच्या 'झपाटलेल्या' या चित्रपटातून 'तात्या विंचू'ने मराठी चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. त्यापूर्वी बॉलिवूडचे शहेनशाह यांच्यासोबत 'महान' या चित्रपटात बाहुल्यांना घेऊन मी काम केले होते त्यावेळी अमिताभ बच्चनदेखील या खेळाला बघून खूप प्रभावित झाले होते. अशा प्रकारे 'अर्धवटराव' आणि 'तात्या विंचू'च्या चित्रपटातील प्रवासाला सुरूवात झाली.
 
4. तुमचे संपूर्ण कुटुंबीय या कलेत तुमच्याबरोबर सहभागी झाले आहेत याबादल तुम्हाला काय वाटते ? 
- आमच्या घरात पहिल्यापासूनच या खेळाची सगळ्यांना आवड होती. ‘बोलक्या बाहुल्यां’च्या या संसारात मला पत्नी अपर्णाची साथ मिळाली. त्यानंतर माझ्या मुलांनीदेखील करिअर म्हणून हीच कला स्वीकारली. आमची तिसरी पिढी या व्यवसायात आहे या गोष्टीचा मला अभिमान आहे. चार ते पाच वर्षांपूर्वी माझा मुलगा  इंडियाज गॉट टॅलेंट या रियालिटी शोच्या फायनलमध्ये तो पोहोचला होता. यानंतर त्याने स्वत: हुन नोकरी सोडून या व्यवसायात येण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता आमचे संपूर्ण कुटुंब ‘बोलक्या बाहुल्या’चे झाले आहे. 
 
5. आजच्या तरूणाईने शब्दभ्रम या कलेत करिअर करावे का ?
-   करिअरच्यादृष्टीने या कलेत खूप वाव आहे. नव्या पिढीने या कलेत करिअर करावे. मात्र ही कला शिकण्यासाठी आणि आत्मसात करण्यासाठी मेहनतीला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे.  
 
 
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :