​ बिग बॉसच्या घरात जायला आवडेल- अजिंक्य देव

वडिलांच्या (ज्येष्ठ अभिनेते रमेश देव )पावलावर पाऊल ठेवत अभिनेते अजिंक्य देव यांनी सिनेसृष्टीत स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हा चिरतरुण अभिनेता आता लवकरच एका हिंदी मालिकेची निर्मिती करीत आहे. तसेच बॉम्बेरीया या हिंदी चित्रपटामध्ये अजिंक्य लवकरच अभिनेत्री राधिका आपटे सोबत पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या विषयी त्यांनी लोकमत सीएनएक्सशी मनमोकळा संवाद साधला. त्याचाच हा सारांश...

​ बिग बॉसच्या घरात जायला आवडेल- अजिंक्य देव
Published: 07 Dec 2016 08:44 PM  Updated: 07 Dec 2016 03:14 PM

  priyanka londhe

वडिलांच्या
(ज्येष्ठ अभिनेते रमेश देव )पावलावर पाऊल ठेवत अभिनेते अजिंक्य देव यांनी सिनेसृष्टीत स्वत:ची एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील हा चिरतरुण अभिनेता आता लवकरच एका हिंदी मालिकेची निर्मिती करीत आहे. तसेच बॉम्बेरीया या हिंदी चित्रपटामध्ये अजिंक्य लवकरच अभिनेत्री राधिका आपटे सोबत पोलिस इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. या विषयी त्यांनी लोकमत सीएनएक्सशी मनमोकळा संवाद साधला. त्याचाच हा सारांश...

 तुम्ही लवकरच एका ऐतिहासिक मालिकेची निर्मिती करणार आहात,असे कळतेय. त्याबद्दल काय सांगाल?
-: होय हे खरे आहे. मी लवकरच एका हिंदी मालिकेची निर्मिती करतोय. एका राणीच्या आयुष्यावर आधारीत ही मालिका असणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांना १७०० सालचा इतिहास पहायला मिळणार आहे. या मलिकेतील भूमिकेसाठी अभिनेत्रीची निवडदेखील झाली आहे. मी सुद्धा या मालिकेत एखाद्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसू शकतो. लवकरच आम्ही याविषयी घोषणा करणार आहोत.

 पूर्वीच्या मालिका आणि सध्याच्या मालिका, यात बरेच अंतर आलेले दिसतेयं, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
-:  मला विचाराल तर, माझ्यादृष्टीने हा अतिशय चांगला बदल आहे. आताश: प्रेक्षकांना नवीन आणि वेगळे काहीतरी पाहायला आवडतेय. याआधी आम्ही ‘२४’ नावाची मालिका केली होती. त्या मालिकेला प्रेक्षकांनी उत्फूर्त प्रतिसाद दिला होता. अशा मालिकांना प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळत आहे.  इंटरनेटवर वेगवेगळ्या विषयांवरच्या वेब सिरीजदेखील पाहायला मिळत आहेत. माझ्या मते,टीव्ही मालिकांमधील हा बदल निश्चीतच वेलकमींग आहे.

 ‘बिग बॉस’ सारख्या शोमध्ये जाण्याची संधी मिळाली तर तुम्ही तो शो कराल का?
-:  ‘बिग बॉस’ सारखा शो करायला काहीच हरकत नाहीये. त्या शोची मांडणी वेगळी आहे, कन्सेप्ट वेगळा आहे. पण ते लोकांना पाहायला आवडतेयं. ‘बिग बॉस’च्या घरात  ज्या-ज्या गोष्टी घडतात त्या पाहता, तिथे राहणे माझ्यासाठी कठीण असेल वा नाही, हे  मला आत्ताच सांगता येणार नाही. पण ‘बिग बॉस’ ट्राय करायला तरी काय हरकत आहे,असे मला वाटते.

 मराठी चित्रपटसृष्टी बदलतेय त्याबद्दल तुम्ही काय सांगाल?
-: मी हा बदल माझ्यासोबत पाहिलाय. येथे काम करत असताना हा चेंज मी स्वत: अनुभवला, अनुभवतोयं. प्रेक्षकांना आता टीव्ही, सोशल मीडिया यासारखे बरेचसे पर्याय उपलब्ध झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या मोठा फायदा या बदलत्या चित्रपटांना झालेला आहे. तरुण कलाकार, निर्मार्ते यांच्यात नवे काहीतरी करण्याची ऊर्मी आहे. त्यामुळे एक चांगले आणि सकारात्मक वातावरण चित्रपटसृष्टीत निर्माण झाले आहे. 

 रंगभूमीवर तुम्ही प्रेक्षकांना कधी दिसणार आहात?
 -: मी अजून नाटकात काम केलेले नाही, हे मी माझे दुर्दैव समजतो. समोर बसलेल्या प्रेक्षकांसमोर  उभे राहून काम करण्याची पूर्वी मला भीती वाटायची. मला फार जास्त बोलायला जमायचे नाही. आता परिस्थिती बदललेली असली तरी नाटकात मी कितपत काम करु शकेल,हे सांगता यायचे नाही. एखादे चांगले नाटक चालून आलेच तर मी नक्कीच विचार करेन.

पूर्वी सारखेच आजही तुम्ही एकदम फिट दिसता, तुमचा फिटनेस फंडा काय आहे?
-: खर सांगायचे झाले तर वडिलोपार्जीतच हे वरदान मला मिळालेले आहे, असेच मी म्हणेल. त् मला नियमित व्यायाम करायला आवडतो. खाण्यावर देखील मी नियंत्रण ठेवतो. जिम वगैरे काही करत नसला तरीमला धावायला खूप आवडतं. मी दररोज ४ ते ५ किमी धावतो. हाच माझा फिटनेस फंडा आहे.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :