​फास्टर फेणेचा निर्माता रितेश देशमुख का चिडला अमेय वाघवर?

अमेयने facebook या सोशल नेटवर्किंग साइटवर नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत ​फास्टर फेणेचा निर्माता रितेश देशमुख त्याच्याकडे रागाने पाहात असल्याचे आपल्याला दिसत आहे.

​फास्टर फेणेचा निर्माता रितेश देशमुख का चिडला अमेय वाघवर?
Published: 04 Oct 2017 12:54 PM  Updated: 04 Oct 2017 03:11 PM

अमेय वाघच्या फास्टर फेणे या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अमेय सध्या चांगलाच व्यग्र आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या दरम्यान नुकतीच एक गंमतीदार गोष्ट घडली. अमेयने त्याच्या फेसबुक पेजवर एक फोटो शेअर केला असून या फोटोची सध्या चांगलीच चर्चा आहे. या फोटोत आपल्याला अमेय आणि फास्टर फेणे या चित्रपटाचा निर्माता रितेश देशमुख दिसत आहेत. या फोटोत रितेश अमेयकडे रागाने पाहात आहे. तर अमेयच्या बाजूला आपल्याला एक मोबाईल दिसत असून त्या मोबाइलमध्ये आपल्याला रितेश देशमुखचा फोटो पाहायला मिळत आहे. 
अमेयने शेअर केलेला फोटो व्यवस्थित पाहिल्यास आपल्याला लक्षात येते की, या फोटोमधील अमेयचा लूक आणि मोबाइलमधील रितेशच्या फोटोचा लूक हा अगदी सारखा आहे. त्या दोघांची केशरचना तर अगदी सेम टू सेम आहे. अमेयचा हा लूक पाहाता अमेयने रितेश देशमुखचा लूक या चित्रपटासाठी कॉपी केला आहे असे आपल्या लक्षात येत आहे. अमेयने आपला लूक कॉपी केला आहे हे बघून रितेशला राग आला आहे का? की रितेशचे रागवण्याचे कारण काही वेगळेच आहे हे आपल्याला केवळ रितेशच सांगू शकणार आहे. 
अमेय वाघ फास्टर फेणे या चित्रपटात बनेश उर्फ फास्टर फेणेच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच चित्रपटात गिरीश कुलकर्णी आणि दिलीप प्रभावळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बनेश्वरवरून पुण्यात मेडिकलची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका जिज्ञासू आणि उत्साही मुलाची म्हणजेच बनेश फेणेची कथा प्रेक्षकांना या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. पक्षीमित्र, निसर्गप्रेमी, टेक्नॉलॉजिचा चाहता आणि सायकलपटू असलेला बनेश पुण्यात येतो तेव्हा तो, त्याची बालमैत्रीण आणि आता पत्रकार असलेल्या अबोलीला तसेच गुन्हेगारी सोडून सरळमार्गी जगायला लागलेल्या लहान मुलाला- भूभूला भेटतो. बनेश परीक्षेच्या तयारीला लागतो. परीक्षा केंद्रावर त्याची धनेश नावाच्या एका चुणचुणीत आणि हुशार मुलाशी ओळख होते आणि दुसऱ्याच दिवशी एक अनपेक्षित घटना घडते. ही घटना बनेशला मुळापासून हादरवून टाकते आणि सगळ्यांच्याच आयुष्यात एक विलक्षण गुंतागुंत निर्माण होते. शिक्षण व्यवस्थेच्या विरोधात आणि सर्वसामान्य माणसाच्या आकलनापलीकडे असणारा निगरगट्ट वृत्तीचा अप्पा; सत्य शोधून काढल्याशिवाय चैन न पडणाऱ्या आणि संकटांना बेधडकपणे सामोरे जाणाऱ्या फेणेसमोर आव्हान म्हणून उभा ठाकतो. या जीवघेण्या शोधात फेणे यशस्वी होतो का याबद्दलचा उत्कंठावर्धक प्रवास या चित्रपटामधून पाहायला मिळेल. अप्पांच्या भूमिकेत दिसणार आहेत राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि अष्टपैलू अभिनेते गिरीश कुलकर्णी. या चित्रपटाचे प्रेरणास्थान असणारे भा. रा.भागवत हे सुद्धा या चित्रपटात आहेत हे विशेष आणि ही भूमिका साकारली आहे ज्येष्ठ आणि महाराष्ट्राचे लाडके अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी. 

Also Read : ​मराठी सेलिब्रिटींचे हे फाफे प्रकरण काय आहे?


नाना पाटेकरचा आपला मानूस हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :