​वीणा जामकर आहे उषा नाईक यांची फॅन

वीणा जामकर उषा नाईक यांची खूप मोठी फॅन आहे. एक हजाराची गोष्ट या चित्रपटातील त्यांची भूमिका तिला खूप आवडते. वीणा त्यांना भेटल्यानंतर एक अभिनेत्री असल्याचे विसरून त्यांची केवळ एक फॅन बनली होती.

​वीणा जामकर आहे उषा नाईक यांची फॅन
Published: 02 Mar 2017 04:17 PM  Updated: 02 Mar 2017 04:17 PM

आपल्याला आवडणारा कलाकार एकदा तरी आपल्याला भेटावा, आपल्याशी त्याने गप्पा माराव्यात असे अनेकांना वाटत असते. आपल्या आवडत्या कलाकाराला भेटून ते नेहमीच खूश होतात. पण एखादा कलाकारही दुसऱ्या कलाकाराचा फॅन असतो आणि त्याला भेटल्यानंतर झालेला आनंद त्याच्यासाठी खूप जास्त असतो. 
वीणा जामकर ही उषा नाईक यांची मोठी फॅन आहे. काही दिवसांपूर्वी वीणा एका स्टुडिओत चित्रीकरण करत असताना उषा नाईक तिच्या समोर आल्या. त्यावेळी ती एक अभिनेत्री आहे हे विसरून ती केवळ उषा नाईक यांची फॅन बनली होती. एक हजाराची नोट या चित्रपटातील त्यांच्या अभिनयाची ती खूप मोठी फॅन आहे. या चित्रपटातील त्यांचा अभिनय पाहून वीणा चाट पडली होती. उषा नाईक यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला अनेक चित्रपटात लावणी सादर केली होती तर अनेक चित्रपटात रोमँटिक सीन सादर केले होते. त्यातील त्यांचा गोड चेहरा इतके विलक्षण भावही चेहऱ्यावर आणू शकतो हे एक हजाराची नोट या चित्रपटात अनुभवून ती स्तिमीत झाली होती. त्यांच्या इतरही सिनेमांमध्ये त्यांनी उत्तम कामे केले असली तरी एक हजाराची नोट या चित्रपटातील त्यांचे काम वीणाला फार आवडते. त्यांना त्यांच्या उतारवायत इतकी चांगली भूमिका साकारायला मिळाली याचे वीणाला अप्रूप वाटते. त्यांना एक हजाराची नोट या चित्रपटातून मिळालेली संधी त्यांनी ओळखली आणि त्याचे सोने केले. 
उषा नाईक यांना ती भेटली याची तुलना तिने प्रियांका चोप्रा मेरील स्ट्रीपला भेटली याच्यासोबत केली आहे. ती सांगते, "प्रियांकाला मेरी स्ट्रिपला भेटून जितका आनंद झाला तितकाच आनंद मला आज उषा ताईंना भेटून झाला आहे." 

priyanka chopra meryl streep

'बाहुबली 2' हा 'बाहुबली1' पेक्षा वरचढ असणार का ?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :