पहेचान कौन ? या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय

हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे.

पहेचान कौन ? या मराठी अभिनेत्याचा स्टायलिश लूक ठरतो आहे सध्या चर्चेचा विषय
Published: 25 Apr 2018 04:45 PM  Updated: 25 Apr 2018 04:45 PM

मेकओव्हर, लूक बदलणे, स्टाइल स्टेटमेंटमध्ये बदल अशा गोष्टी अनेकदा फक्त अभिनेत्रींबाबत ऐकायला मिळायच्या.मात्र आता काळ बदललाय आणि स्पर्धाही वाढलीय. त्यामुळे या स्पर्धेच्या युगात टिकून राहायचं असेन तर काळानुरुप बदलायला हवं ही बाब आता अभिनेत्यांच्याही लक्षात येऊ लागली आहे. त्यामुळे सध्याचे अभिनेते मात्र लूक्स आणि स्टाइलबाबत फारच सजग झाले आहेत.हिंदी अभिनेत्यांमध्ये हा ट्रेंड गेल्या अनेक वर्षांपासून रुढ झाला आहे. असं असलं तरी मराठी अभिनेता कधी ही आपला लूक चेंज करत नाही किंवा तो तसे करायला घाबरतो अशी ओरड अनेकदा ऐकायला मिळते. मात्र सध्याची नव्या कलाकारांची पीढी या गोष्टीला छेद देणारी आहे. याचेच ताजे उदाहरण म्हणजे शशांक केतकर. 'होणार सून मी' या घरची या मालिकेमुळे अभिनेता शशांक केतकर घराघरात पोहचला.आता शशांक पुन्हा चर्चेत आला आहे. तो म्हणजे शशांकचा बदललेला लूक. रॉकिंग अंदाज, स्टाइल, हटके हेअर स्टाइल आणि दाढी यामुळे शशांक सध्या सा-यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे. त्याच्या या लूकवर बरीच चर्चाही रंगली आहे. आतापर्यंत मालिकेबरोबर 'गोष्ट तशी गंमतीची' आणि  'आबालाल अडकित्ते आणि मुमताज महल' या नाटकामधून त्याने नाट्यरसिकांची मने जिंकली आहेत.याशिवाय 'वन वे तिकीट' या सिनेमातून त्याने मोठ्या पडद्यावरही रसिकांवर जादू केली आहे.अभिनयात छाप पाडणा-या शशांकला वेगवेगळ्या गोष्टीमध्येही आवड आहे. 

माणुसकीची भिंत या संपूर्ण संकल्पनेला कशाप्रकारे हरताळ फासला आहे हे शशांकने फोटोच्या माध्यमातून जगासमोर आणलं होतं.शशांकने आपल्या पोस्टमध्ये अस्वच्छता पसरवणा-यांना खडे बोल सुनावले होते. शशांकच्या या पोस्टचा इफेक्ट म्हणा किंवा आणखी काही.लगेचच या ठिकाणचं चित्र पालटलं आहे.अस्वच्छ झालेला हा परिसर स्वच्छ करण्यात आला. इतकंच नाही तर या ठिकाणी भिंतीभोवती उंच अशी जाळीही उभारण्यात आली आहे. ज्या पद्धतीने अस्वच्छ झालेल्या माणुसकीच्या भिंतीचं चित्र शशांकने जगासमोर आणलं, त्याच पद्धतीने या ठिकाणी झालेला बदलही त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सा-यांसमोर आणला आहे. या बदला संदर्भातील फोटो आणि एक पोस्ट शशांकने त्याच्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे. 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :