बॉलिवूडमध्ये आपल्या मादक अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री सनी लिओनी लवकरच एक बिग बजेट मराठी चित्रपटात आयटम सॉँग करणार आहे. शाहरूख खानच्या ‘रईस’ या चित्रपटात ‘लैला मैं लैला’ या आयटम सॉँगवर ठुमके लावणारी सनी आता मराठीतही दिसणार असल्याने तिच्या फॅन्ससाठी ही खूशखबरच म्हणावी लागणार आहे.
या बातमीचा खुलासा खुद्द चित्रपट निर्माता अवधूत गुप्ते याने एका मुलाखतीत केला आहे. डीएनए न्यूजने दिलेल्या माहितीनुसार, अवधूतने म्हटले की, मी एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करीत आहे. ज्याकरिता मी चित्रपटातील एका आयटम सॉँगसाठी अभिनेत्री सनी लिओनी हिला अप्रोच झालो आहे. प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यासाठी अन् प्रोमोशनमध्ये याचा फायदा होण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर अवधूतने असेही सांगितले की, सनीच्या इच्छेप्रमाणे गाण्याची निर्मिती करणे खूपच अवघड आहे.
सनीचे हे आयटम सॉँग गणेश आचार्य कॉरिओग्राफ करणार असून, चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल देवरूखकर करणार आहे. हा चित्रपट तरुणांच्या भावविश्वावर आधारित असल्याने, यामध्ये सनीचे मराठी अंदाजातील झटके प्रेक्षकांना जबरदस्त भावणार आहेत. ‘लैला मैं लैला’मध्ये ज्या पद्धतीने सनीने आपले जलवे दाखविले होते, तसाच जलवा या आयटम सॉँगमध्येही बघावयास मिळेल अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे.
सध्या सनी लिओनी जरी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेमहीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती एक रेस्टॉरेंटमध्ये गेल्याचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. सनीनेही हे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. फोटोच्या कॅप्शनमध्ये सनीने लिहिले की, ‘माझ्या हातात मेन्यू असून, त्यातील कुठली आॅर्डर द्यावी याचा मी विचार करीत आहे.’ सनीच्या या फोटो तिच्या फॅन्सनी प्रचंड कमेंट दिल्या.