​सिद्धार्थ चांदेकर लंडनमध्ये करतोय गुलाबजामचे चित्रीकरण

​सिद्धार्थ चांदेकर सध्या लंडनमध्ये गुलाबजामचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटातील त्याचा लूकदेखील त्याने नुकताच शेअर केला आहे.

​सिद्धार्थ चांदेकर लंडनमध्ये करतोय गुलाबजामचे चित्रीकरण
Published: 19 May 2017 05:28 PM  Updated: 19 May 2017 05:28 PM

सिद्धार्थ चांदेकर गेल्या काही दिवसांपूर्वी लंडनला रवाना झाला आहे. मी लंडनला जात आहे अशी पोस्ट त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली होती. पण या पोस्टमध्ये तो लंडनला का जातोय हे त्याने त्याच्या फॅन्सपासून लपवून ठेवले होते. बहुधा त्याला त्याच्या फॅन्सना सरप्राइज द्यायचे होते. पण काही दिवसांनंतर फेसबुकला त्याने पोस्ट करून गुलाबजाम या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तो लंडनला गेला असल्याचे त्याने त्याच्या फॅन्सना सांगितले. तसेच त्यासोबत त्याने एक फोटो देखील पोस्ट केला. या फोटोमध्ये एक वेगळाच सिद्धार्थ आपल्याला पाहायला मिळत आहे. या फोटोत त्याने कोट घातलेला आहे आणि त्याने एक मफलर त्याच्या गळ्यात गुंडाळलेला आहेत. तसेच काळ्या रंगाचा चष्मा देखील घातलेला आहे. हा लूक त्याच्या गुलामबजाम या चित्रपटातील असल्याचे त्यानेच फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. हा लूक पाहून सिद्धार्थ प्रेक्षकांना एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे दिसून येतेय.
तसेच तो लंडनला गेल्यापासून अनेक फोटो त्याच्या सोशल नेटवर्किंगला पोस्ट करत आहे. त्या फोटोंना त्याच्या फॅन्सचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. ते या फोटोला अनेक लाइक्स देत असून त्यावर अनेक जण कमेंट देखील करत आहेत.
गुलाबजाम या चित्रपटाची घोषणा काहीच महिन्यांपूर्वी झाली होती. सिद्धार्थ चांदेकरने या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करून आमच्या रेसिपीला सुरुवात झाली असे मार्चच्या सुमारास म्हटले होते.
गुलाबजाम या चित्रपटात सिद्धार्थ चांदेकरसोबत सोनाली कुलकर्णी, चिन्मय उद्गिरकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर हा चित्रपट सचिन कुंडलकरने दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण पुण्यातील विविध भागांमध्ये झाले आहे.  



गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :