​सावनी रविंद्रचा झाला साखरपुडा

गायिका सावनी रविंद्रचा साखरपुडा आशिष डांगेसोबत झाला असून तो पेशाने डॉक्टर आहे. आशिष हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे.

​सावनी रविंद्रचा झाला साखरपुडा
Published: 19 Mar 2018 05:03 PM  Updated: 19 Mar 2018 05:03 PM

गायिका सावनी रविंद्रचा साखरपुडा नुकताच पुण्यात झाला. गुढीपाडव्याच्या संध्याकाळी सावनीने ठरावीक मित्र मैत्रिणींच्या उपस्थितीत साखरपुडा केला. कात्रजमधील एका सभागृहात हा साखरपुडा पार पडला. या साखरपुड्याला मराठी इंडस्ट्रीतील सावनीच्या जवळचे मित्रमैत्रीण उपस्थित होते. सावनीचा साखरपुडा आशिष डांगेसोबत झाला असून तो पेशाने डॉक्टर आहे. आशिष हा मुळचा पुण्याचा असून त्याचे सगळे शिक्षण देखील पुण्यात झाले आहे. आशिष डांगेने त्याच्या होणाऱ्या पत्नीसाठी म्हणजेच सावनीसाठी साखरपुड्याला एक छानसे गाणे देखील गायले. सावनीनेच साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करून साखरपुड्याबाबत तिच्या फॅन्सना सांगितले आहे. साखरपुड्याला सावनीने हिरव्या रंगाची साडी नेसली होती. या गेटअपमध्ये ती खूपच छान दिसत होती. या तिच्या फोटोंवर तिच्या फॅन्सनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. 
आपल्या सुरेख आवाजाने गायिका सावनी रविंद्र हिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. तिने मराठी चित्रपटसृष्टीत एक से एक गाणी गायिली आहेत. तिच्या प्रत्येक गाण्याने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. सावनी ही खूप चांगली गायिका म्हणून आपल्या सर्वांच्याच परिचयाची आहे. शास्त्रीय संगीताचा भक्कम पाया आणि पाश्चिमात्य संगीताची उत्तम समज असे कमालीचा कॉम्बो सावनीच्या आवाजात आपल्याला ऐकायला मिळतो. सावनीने तामिळ इंडस्ट्रीमध्ये देखील खूप गाणी गायली आहेत. नुकतेच तिचे वेन्निलविन सालईगलिल हे गाणे प्रदर्शित झाले आहे. तिच्या या गाण्याला सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात लाइक्स मिळताना दिसत आहे. छोटया पडदयावरदेखील तिच्या आवाजाची जादू ऐकण्यास मिळाली.
सावनी रविंद्रच्या घरी संगीत क्षेत्रातील दिग्गजांचे येणं-जाणं कायम असायचे. त्यातलं एक मोठ्ठं नाव म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी. त्यांच्याकडे बघून, ऐकून सावनी तयार झाले. वयाच्या १४व्या वर्षापासून ती त्यांच्यासोबत गाणी गावू लागले. हृदयनाथजी यांच्यासोबत ती अनेक वर्षं प्रोफेशनली गात होती आणि २०११ मधील ‘झी सारेगमप’ मध्ये सहभागी झाले. आणि त्या सीजनची ती फायनलिस्ट ठरली होती. होणार सून मी या घरची या मालिकेच्या शीर्षकगीतामुळे ती नावारूपाला आली. 

Also Read : ‘संगीत माझा श्वास’-सावनी रविंद्र


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :