Gachchi:प्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल

गच्ची आणि ती दोघे अशा त्रिकोणात बनलेला या सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलाच गाजला असून, वेबसिरीजचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या अभयला त्याच्या चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.

Gachchi:प्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल
Published: 06 Dec 2017 05:54 PM  Updated: 06 Dec 2017 05:54 PM

आयुष्यातील सुखदुखाची साक्षीदार ठरलेली 'गच्ची' शहरातील प्रत्येक माणसासाठी खास असते.बालपणाच्या गोड आठवणींचा संच दडलेल्या या जागेची सर इतर कोणत्याही ठिकाणाला नाही. म्हणूनच तर, प्रत्येकांची पर्सनल स्पेस असलेली हि 'गच्ची', सिनेमाद्वारे लोकांच्या भेटीला येत आहे. लँडमार्क फिल्म्सच्या विधी कासलीवाल प्रस्तुत आणि नितीन वैद्य प्राॅडक्शन्स यांची निर्मिती असलेला हा सिनेमा येत्या २२ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभय महाजन आणि प्रियाबापट यांची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर ट्रेलर लाँच करण्यात आले. मुंबईच्या भाऊगर्दीत उंचावर वसलेल्या अश्या अनेक 'गच्ची'पैकी एक असलेली ही मोकळी हवेशीर जागा, आपणास या ट्रेलरमधून पाहायला मिळते. शिवाय प्रियाबापट आणि अभय महाजन या सिनेमातील प्रमुख पात्रांमधील वादविवाददेखील यातून दिसून येतात. आयुष्यात उभ्या ठाकलेल्या बिकट परिस्थितीला आपापल्यापरीने सामोरे जाणा-या या दोघांचे, वैचारिक मतभेद यात पाहायला मिळत असून त्यातून फुलत जाणारी त्यांची मैत्रीदेखील आपणास दिसून येते. गच्चीवर अनावधाने भेटलेल्या या दोन अनोळखी व्यक्तिमत्वांची रंजक गोष्ट सिनेमाच्या ट्रेलरमधून लोकांसमोर येतो.नचिकेत सामंत दिग्दर्शित 'गच्ची' सिनेमाचा हा ट्रेलर पाहताना जितका रोमांचक दिसतो, तितकाच तो प्रेक्षकांना संभ्रमातदेखील टाकतो.गच्ची आणि ती दोघे अशा त्रिकोणात बनलेला या सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीतच सोशल साईटवर चांगलाच गाजला असून, वेबसिरीजचा चेहरा म्हणून ओळख असलेल्या अभयला त्याच्या चाहत्यांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे. तसेच संपूर्ण महाराष्ट्राला अभिनय कौशल्ल्याने भूरळ पाडणारी अभिनेत्री प्रिया बापट, पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाची मोठी मेजवानी घेउन येत आहे.

'गच्ची' साठी प्रियाची 'लपाछपी'
नचिकेत सामंत दिग्दर्शित 'गच्ची' या सिनेमाचे मुंबईच्या लालबाग येथील 'विघ्नहर्ता' या टोलेजंग इमारतीच्या गच्चीवर चित्रीकरण करण्यात येत होते. मराठीबहू लोकवस्ती असलेल्या या भागात प्रिया बापट हे नाव खूप मोठे असल्याकारणामुळे, २३ मजल्याच्या इमारतीतून गच्ची गाठण्याचे मोठे आव्हान तिच्याकडे होते. अश्यावेळी तोंडाला स्कार्फ गुंडाळत तडक लिफ्टच्या दिशेने धावत जात, स्वत:ची ओळख लपवण्याचा तिने कसोशीने प्रयत्न केला होता. मात्र, शेवटच्या दिवशी प्रियाचे गुपित समोर येईल असा एक प्रसंग तिथे घडला. सिनेमाच्या शेवटच्या सीनचे चित्रीकरण त्यादिवशी होणार होते, गच्चीवर शूट असल्याकारणामुळे अंधार व्हायच्याआधी चित्रीकरण संपवणे गरजेच होत. मात्र, एनवेळी लिफ्ट बंद पडल्यामुळे, 'प्रिया'ला सेटपर्यंत कसे घेऊन जायचे हा प्रश्न टीमला पडला, तसेच सूर्यास्ताला काहीच तास राहिले असल्यामुळे, चित्रीकरण वेळेत पूर्ण होणे अशक्य झाले होते. अशावेळी प्रियाने स्वतःचा चेहरा झाकत २३ मजले पायी चढत गच्ची गाठली. आश्चर्याची बाब म्हणजे, आपल्यासमोरून आपली लाडकी अभिनेत्री जात आहे, याचा अंदाजदेखील कोणालाच आला नव्हता. प्रियाने हा 'लपाछपी' चा डाव अगदी शेवटपर्यंत चालू ठेवला होता, आणि त्यात ती यशस्वीदेखील झाली. कारण, चित्रीकरणाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आपल्या गच्चीवर प्रिया बापटच्या सिनेमाचे शुटींग होते, हे बिल्डींगमधील कोणालाच कळले नव्हते. 

'गच्ची' सिनेमाच्या या मजेशीर आठवणीला उजाळा देताना प्रिया सांगते कि, 'मला प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकायला, त्यांच्यासोबत काही क्षण घालवायला आवडते. त्यांना नकार देणे मला आवडत नाही. मात्र, शुटींगदरम्यान कामाला पहिले प्राधान्य देताना, ते कधी कधी दुखावले जातात. त्यामुळे ते टाळण्यासाठी, तसेच शुट स्मूथली चालू राहण्यासाठी, मी स्वतःची ओळख लपवण्याचा करते. शिवाय काही चित्रपटातील लूक हे गुपित ठेवायचे असतात, त्यामुळे इतक्या लवकर लोकासमोर त्याचा उलगडा होऊ नये, यासाठी शक्यतो प्रत्येक कलाकार तसा प्रयत्न करत असतो. 'गच्ची' सिनेमाच्या चित्रिकरणादरम्यान असेच काहीसे माझ्यासोबत घडले.असल्याचे प्रियाने सांगितले.


राणी मुखर्जीचा हिचकी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :