अश्विनी भावे यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत असा साजरा केला वाढदिवस,पाहा PHOTO

अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे.

अश्विनी भावे यांनी अमेरिकेत कुटूंबासोबत असा साजरा केला वाढदिवस,पाहा PHOTO
Published: 08 May 2018 01:42 PM  Updated: 08 May 2018 01:42 PM

सेलिब्रिटींचा बर्थ डे सेलिब्रेशन थो़डं खास असतं... थोडं हटके असतं.बॉलिवूड सेलेब्सच्या वढदिवसाला त्यांच्या घराबाहेरची गर्दीही आता आपल्याला नित्याचीच झालेली आहे. लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झालेल्या अभिनेत्री अश्विनी भावे मात्र आपल्या वाढदिवसाचा मोठा गाजावाजा न करता अगदी साध्या पद्धतीने साजरा करतात. यंदाही त्यांनी आपल्या पती आणि मुलांसहच आपला वाढदिवस साजरा करणं पसंत केला. अमेरिकेतून आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनविषयी सांगताना त्या म्हणाल्या,” मला आपल्या कुटूंबासोबत वेळ घालवायला खूप आवडतो. माझी मुलगी दरवर्षी माझ्या वाढदिवसाला केक बनवते. सॅनफ्रान्सिसकोच्या ‘बे एरिया’त आमचे बाकीचे फॅमिली मेंबर्स वास्तव्याला आहेत. आम्ही सगळे एकत्र येऊन सेलिब्रेशन करतो. आणि ह्या सगळ्यावर ‘टॉपिंग ऑफ दि केक’ सारखं असतं, सर्वात शेवटंच पण महत्वाचं म्हणजे, रात्री नव-यासोबत डिनर डेटला जाणं.”लहानपणीच्या आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनबाबतच्या त्या आठवणी सांगताना हसून म्हणतात, “माझा वाढदिवस मे महिन्यात येत असल्याने त्यादिवशी घरी आमरस बनवायचा रिवाज होता. जो मला आवडायचा नाही. आणि मी खूप चिडायचे.”

मराठीसह हिंदी सिनेमात 1990 च्या दशकात आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकणा-या अभिनेत्री म्हणजे अश्विनी भावे. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर मोहिनी घातली. काही वर्षांपूर्वी एनआरआय किशोर बोर्डिकर यांच्यासह लग्नबंधनात अडकल्यानंतर अश्विनी भावे अमेरिकेत स्थायिक झाल्या. मात्र अमेरिकेत स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी आपलं मराठीपण कायम जपलं आहे.अमेरिकेत संसार सांभाळताना आपल्या मुलांवरही त्यांनी मराठीचे संस्कार केले. अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांचं मराठी प्रेम, मराठी संस्कृतीवरील प्रेम कमी झालेले नाही. दारापुढे अंगण, अंगणात तुळस आणि सोबतीला इतर झाडं अशी संस्कृती ग्रामीण भाग वगळता अपवादानेच पाहायला मिळते. शहरी भागातून लोप पावत जाणारी हीच मराठी अंगण संस्कृती अभिनेत्री अश्विनी भावे यांनी परदेशात जोपासली आहे.

अश्विनी यांनी नुकतीच स्वतःची www.ashvinibhave.com हि वेबसाईट लाँच केली आहे आणि वेबसाईटचे आकर्षण म्हणजे अश्विनी यांचे एक्सक्लुसिव्ह असे फोटोज. आजही त्यांच्या सुंदरतेचे मापदंड देणारे असे ते फोटोज प्रेक्षकांना या वेबसाईटवर पाहायला मिळत आहेत.अश्विनीबद्दल सर्वच माहिती या वेबसाईटवर अगदी सहजरित्या मिळणार आहे. फक्त चित्रपटच नाही,तर संपूर्ण आयुष्याची कारकीर्द चाहत्यांना जवळून अनुभवता येईल. या वेबसाईटद्वारे तिच्या फॅन्सना तिच्या संपूर्ण आयुष्याचा सफर घेता येईल. किशोर वयापासून ते आतापर्यंत तिच्या आयुष्यात घडलेल्या सर्वच गोष्टींची नोंद त्यात करण्यात आली  आहे.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :