बॉलिवूड अथवा हॉलिवूड चित्रपटात बोल्ड सीन, इंटिमेट सीन दाखवले जाणे यात काही नवीन नाही. पण मराठी चित्रपटांमध्ये आपल्याला खूपच कमी वेळा बोल्ड सीन पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या जोगवा या चित्रपटात उपेंद्र लिमये आणि मुक्ता बर्वे यांच्यावर किसिंग सीन चित्रीत करण्यात आला होता. या किसिंग सीनची चांगलीच चर्चा झाली होती आणि आता लव्ह बेटिंग हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटामध्ये अनेक बोल्ड आणि इंटिमेट सीन दाखवले जाणार असल्याचे कळतेय. या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरू असून या चित्रपटात चिराग पाटील, काजल शर्मा, आदित्य देशमुख, स्मिता गोंदकर, वैभव मांगले यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात काजल शर्मा, चिराग पाटील आणि स्मिता गोंदकर आणि आदित्य देशमुखची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आदित्य आणि स्मिता यांच्यावर या चित्रपटात अनेक बोल्ड सीन चित्रीत केले गेले असल्याचे म्हटले जात आहे. या चित्रपटात स्मिता गोंदकर प्रेक्षकांना एका वेगळ्या रूपात पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तिने अनेक इंटिमेंट सीन दिले असल्याचे कळतेय. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू मेश्राम यांचे आहे. राजू यांनी याआधी खैलरांजीच्या माथ्यावर या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते तर या चित्रपटाची निर्मिती लालचंद शर्मा आणि सुनीता शर्मा यांची आहे. लालचंद शर्मा यांची मुलगी काजलच या चित्रपटात प्रमुख भूमिकेत झळकणार आहे.
लव्ह बेटिंग या चित्रपटात स्मिता साकारत असलेली भूमिका साकारण्यासाठी अनेक अभिनेत्रींना विचारण्यात आले होते. पण इंटिमेंट सीनमुळे त्यांनी या चित्रपटाला नकार दिला असेदेखील कळतेय.