पूजा सावंतचा स्टनिंग लूक,सोशल मीडियावर व्हायरल

पूजा सावंतचे हे सगळे हॉट अदा असलेले फोटो पाहून पूजा सावंतला काहीतरी हटके आणि वेगळे करण्याच्या विचारात असल्याचे जाणवते. तुर्तास पूजा सावंतचे निरनिराळे अंदाज सोशल मीडियावर हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.

पूजा सावंतचा स्टनिंग लूक,सोशल मीडियावर व्हायरल
Published: 20 Nov 2017 04:47 PM  Updated: 20 Nov 2017 04:47 PM


अभिनेत्री पूजा सावंतने नुकताच सोशल मीडियावर तिचे काही फोटो शेअर केले आहेत.या फोटोमध्ये तिचे  स्मोकी आय मेकअप पाहायला मिळत असून या लूकमध्ये तिचे सौदर्य  आणि हटके अंदाज लक्ष वेधून घेतोय.हिरव्या रंगाच्या ड्रेस तिने परिधान केला असून हातात ड्रेसला मॅच होईल असे क्लच घेतल्याचे पाहायला मिळतंय.तर ड्रेसच्या कलरला कॉन्ट्रास्ट मॅच असे लाल रंगाचे कानातले तिने घातल्यामुळे तिचा फुल ऑन स्टायलिश लूक पाहायला मिळतोय.तिचा हा फोटो पाहताच तिच्या चाहत्यांनी तिला खूप सारे कमेंटस आणि लाईक्स दिल्याचे पाहायला मिळत आहे.पूजाने फोटो शेअर करताच ३५ हजारहून अधिक लाईक्स आणि १६१हून अधिक कमेंट आल्याचे पाहायला मिळत आहे. काहींनी तर मराठीची स्टाईल ऑयकॉन म्हणूनही बोलवायला सुरूवात केली आहे.गेल्या काही महिन्यांमध्ये तिच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे असेच काहीसे घायाळ करणारे लूक्स पाहायला मिळतील.तिचा ड्रेसिंग सेन्स आणि तिचे सौदर्य यांमुळे पूजा सावंत चाहते तिच्या अभिनयाप्रमाणे स्टायलिश लूकचेही दिवाने झाल्याचे पाहायला मिळत आहे.

'भेटली तू पुन्हा', 'दगडी चाळ', 'पोस्टर बॉईज' अशा सिनेमांमधून झळकलेली अभिनेत्री पूजा सावंतचा  स्विट अँड सिंपल लूकबरोबच बोल्ड अंदाजही रसिकांना भावतो.त्यामुळे तिच्या या लूकपेक्षा पूजा सावंतच्या हॉट अँड सेक्सी लूकचीच चर्चा जास्त होते.पूजाचा बॅकलेस साडीमधला बोल्ड लूक असो किंवा मग  'लपाछपी' सिनेमाच्यावेळी लंडन फिल्म फेस्टीव्हलमध्ये पूजाच्या सेक्सी अंदाज असो  तिचा बोल्ड लूक आणि बिनधास्त अंदाज कुणालाही क्लीन बोल्ड करेल असाच होता.'लपाछपी' सिनेमावेळी सिनेमापेक्षा पूजाच्या त्या लूकचीच जास्त चर्चा झाली होती.त्यामुळे आता पूजा सावंत कोणत्या कार्यक्रमात येते तेव्हा तिचा बोल्ड अवतार सगळ्यांनाच घायाळ करतो. मात्र तिचे हे सगळे हॉट अदा असलेले फोटो पाहून पूजा सावंतला काहीतरी हटके आणि वेगळे करण्याच्या विचारात असल्याचे जाणवते. तुर्तास पूजा सावंतचे निरनिराळे अंदाज सोशल मीडियावर हिट ठरत असल्याचे पाहायला मिळत आहे.


पद्मावती चित्रपटाला होत असलेला विरोध योग्य आहे असे तुम्हाला वाटते का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :