अभिनेता चिन्मय मांडलेकरला काय विसरण्याची सवय आहे? ऐकून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही

विसराळू व्यक्तींचा आमनासामना कायमच दैनंदिन जीवनात होतच असतो. विसराळू हा टॅग जसा सामान्यांना लागू पडतो तसाच तो काही सेलिब्रिटींनाही लागू पडतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यांत अभिनेता चिन्मय मांडलेकरचंही नाव घ्यावं लागेल. कारण चिन्मयला विसरण्याची एक अशी सवय आहे की तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही.

अभिनेता चिन्मय मांडलेकरला काय विसरण्याची सवय आहे? ऐकून तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही
Published: 27 Sep 2017 11:46 AM  Updated: 27 Sep 2017 11:46 AM

मुंबईत प्रत्येक जण कामात बिझी असतात. कामाच्या गडबडीत अनेक गोष्टी करायच्या राहून जातात. कामाचा ताण म्हणा किंवा आणखी इतर जबाबदा-या, यामुळे काम करताना नागरिक ब-याच गोष्टी विसरुन जातात. या गोष्टीला सेलिब्रिटीसुद्धा अपवाद नाही. सेलिब्रिटींच्या कामाचं शेड्युल तर आणखी बिझी असतं. सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत कलाकार त्यांच्या सिनेमा आणि मालिकांच्या शूटिंगमध्ये बिझी असतात. या कामाच्या धबडग्यात एखादी गोष्ट विसरणं सहज शक्य आहे. मात्र विसरणं हे तुमच्या स्वभावातच असेल तर. विचारात पडलात ना. विसराळू हा शब्द आपण अनेकदा ऐकला आहे. विसराळू व्यक्तींचा आमनासामना कायमच दैनंदिन जीवनात होतच असतो. विसराळू हा टॅग जसा सामान्यांना लागू पडतो तसाच तो काही सेलिब्रिटींनाही लागू पडतो असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. यांत अभिनेता चिन्मय मांडलेकरचंही नाव घ्यावं लागेल. कारण चिन्मयला विसरण्याची एक अशी सवय आहे की तुम्हीही चक्रावल्याशिवाय राहणार नाही. चिन्मयला त्याची स्वाक्षरी (सही) विसरण्याची सवय आहे. ब-याचदा आपल्याला चेकबुक किंवा इतर महत्त्वाच्या कामासाठी स्वाक्षरी (सही) करावी लागते. कोणताही गोंधळ नको म्हणून आपण ती स्वाक्षरी सगळीकडे एकच राहिल याची काळजी आपण घेतो. बँकांमध्ये स्वाक्षरी पडताळणीसुद्धा होते. त्यामुळे बँकेच्या संबंधित कामांसाठी अर्ज करताना केलेली स्वाक्षरी कायम ठेवण्याची काळजी प्रत्येकजण घेत असतो. मात्र याला चिन्मय अपवाद आहे. कारण दरवेळी तो आपली स्वाक्षरी विसरतो. याचा खुलासा खुद्द चिन्मय मांडलेकरने छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मराठी कॉमेडी शोमध्ये केला आहे. स्वाक्षरी विसरण्याचा फटकाही चिन्मयला वेळोवेळी बसला आहे. एकदा फ्लॅटची रक्कम अदा करण्यासाठी चिन्मयला चेक द्यायचा होता. त्यावेळी चिन्मयने त्याच्या विसरण्याच्या सवयीमुळे बँकेतील नेहमीच्या स्वाक्षरीपेक्षा वेगळीच स्वाक्षरी त्याने चेकवर केली. त्याचा परिणाम असा झाला की चिन्मयने दिलेला हा चेक बाऊन्स झाला. हे एकदा नाही तर वारंवार घडल्याचेही त्याने सांगितले. खुद्द चिन्मयने दिलेल्या या कबुलीमुळे या शोमध्ये उपस्थितांना आपलं हसू अनावर झालं.


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :