फेसबुकवरील व्हिडीओमुळे या अभिनेत्याचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण

फेसबुकवरील एका व्हिडीओमुळे सोलापूरमध्ये राहाणाऱ्या एका मुलाला चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. आता तो एका चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

फेसबुकवरील व्हिडीओमुळे या अभिनेत्याचे चित्रपटात काम करण्याचे स्वप्न झाले पूर्ण
Published: 06 Nov 2017 10:30 AM  Updated: 06 Nov 2017 10:30 AM

सोलापुरचा एक युवक आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत नाटक पाहण्यासाठी पुण्याला जातो... नाटक सुरू होण्यापूर्वी तो नेहमीच्या सवयीप्रमाणे डबस्मॅशवर एक व्हिडीयो शुट करून फेसबुकवर अपलोड करतो आणि नाटक पाहून झाल्यावर त्याला त्याच्या मित्राचा फोन येतो... आणि तो चक्क एका सिनेमासाठी हिरो म्हणून सिलेक्ट होतो... आहे ना अचंबित करणारी गोष्ट?
तर सीन आहे असा की, 'गेला उडत' या नाटकाचा पुण्यात प्रयोग होता. सोलापूरचा आल्हाद अंदोरे आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत सिद्धार्थ जाधव आणि अमीर तडवळकर यांची भूमिका असलेला 'गेला उडत'चा प्रयोग पाहण्यासाठी पुण्याला गेला होता. नाटक सुरू व्हायला थोडा अवकाश असल्याने ॲक्टिगचे वेड असलेल्या आल्हादने नेहमीच्या सवयीप्रमाणे प्रेक्षागृहाच्या संकुलात डबस्मॅशवर नक्कल करणारे व्हिडीयो काढणे सुरू केले. त्यातील एक डबस्मॅश व्हिडीयो आणि इन्स्टाग्रामवरील बुमरँग व्हिडीयो मित्र अमीर तडवळकर यांना टॅग करून फेसबुकवर अपलोड केला. संपूर्ण नाटक पाहून बाहेर पडतो, तोच त्याला एक फोन आला. फोन अमीर तडवळकरचा होता. अमीरने त्याला तात्काळ नाटकाच्या गाडीजवळ बोलावले. तो गेला... भेटला. अमीरने स्वत:च्या फोनवरून एक फोन लावला आणि आल्हादच्या हातात दिला आणि म्हणाला बोल. फोनवर समोरची व्यक्ती होती... दिग्दर्शक केदार शिंदे.  
फेसबुकवर टॅग केलेले डबस्मॅश आणि बुमरँग व्हिडीयो केदार शिंदेनी पाहिले होते आणि अमीर तडवळकरला कॉल करून आल्हादबद्दल विचारणा केली होता. सोलापूरच्या एकाच नाट्यवलयातील असल्याने अमीर आल्हादला चांगला ओळखत होता. त्याने आल्हादच्या एकांकिका आणि नाटकातील कारकिर्दीबद्दल सांगितले. केदार शिंदेंनी आल्हादला फोनवरून ऑडिशन पाठवायला सांगितले. आल्हादसाठी हे सारे स्वप्नवतच होते.

Rangeela Rayabaa
वेगवेगळ्या शैलीत आल्हादने आपल्या अभिनयाचे व्हिडीयो शूट केले आणि अमीरच्या माध्यमातून केदार शिंदेना व्हॉट्स ॲपवर पाठवले. मग काय! काही वेळाने आल्हादचा मोबाईल खणाणला... 'हॅलो... आल्हाद!  केदार शिंदे बोलतोय… लगेच बॅग पॅक करायची आणि मुंबईला यायचे. तुच आहेस माझा रंगीला रायबा. तुला लीड रोल देतोय. घरी सांग आता हिरो बनूनच सोलापूरला परतेन! मग काय...केदार शिंदेच्या बोलण्याप्रमाणे बॅग पॅक झाली आणि आल्हाद मुंबईत हजर झाला.
आल्हाद... दिसायला हॅण्डसम... उत्तम भाषाशैली... विनम्र... त्याला अभिनयाची उत्तम जाण... सोलापूरच्या कॉलेज रंगभूमीवरचा हिरो आणि व्यवसायाने अॅडव्होकेट! आतापर्यंत त्याने अनेक एकांकिका केल्या. त्यात ‘अस्वल’ आणि ‘दे धक्का’ या एकांकिका गाजल्या. ‘इस्केलॅवो’ आणि ‘हिल टॉप व्हिला’ या व्यावसायिक नाटकांनी त्याला ओळख मिळवून दिली. लहानपणापासून बालनाट्यात काम करणाऱ्या आल्हादचे सिनेमात हिरो बनण्याचे स्वप्न ‘गेला उडत’ हे नाटक पाहून साकार झालंय. रंगीला रायबा येत्या १० नोव्हेंबरला महाराष्ट्रभरात प्रदर्शित होतोय. 

Also Read : केदार शिंदे करणार गुजराती नाटकाचे दिग्दर्शन


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :