‘Thank U विठ्ठला’ ची टीम नव्या कलाकृतीसाठी सज्ज

‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास मांडण्यात आला असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

‘Thank U विठ्ठला’ ची टीम नव्या कलाकृतीसाठी सज्ज
Published: 09 Nov 2017 10:26 AM  Updated: 09 Nov 2017 10:26 AM

चांगली टीम जुळून आली की, निर्माण होणारी कलाकृती नेहमीच प्रेक्षकांच्या कौतुकास पात्र ठरते. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आलेली या चित्रपटाची टीम पुन्हा एकदा आपली कमाल दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. आपल्या या आगामी चित्रपटाची घोषणा त्यांनी नुकतीच केली असून चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञांच्या निवडीची घोषणा लवकरच करण्यात येईल. ‘Thank U विठ्ठला’ च्या यशानंतर या चित्रपटाच्या टीमला नायजेरियातील महाराष्ट्र मंडळाकडून आमंत्रित करण्यात आले आहे. येत्या रविवारी १२ नोव्हेंबरला नायजेरियाच्या ओझोन सिनेमागृहात ‘Thank U विठ्ठला’ चित्रपटाचा खास शो आयोजित करण्यात आला आहे.‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटाच्या दरम्यान जुळलेले हे सूर लक्षात घेत नव्या कलाकृतीसाठी या टीमने परत एकदा पुढाकार घेतला आहे. निर्माते गोवर्धन काळे, कार्यकारी निर्माते जितेंद्र कुलकर्णी, दिग्दर्शक देवेंद्र जाधव, लेखक व सहनिर्माते एम.सलीम,  सिनेमेटॉग्राफर दिनेश सिंग आता प्रेक्षकांसाठी काय नवीन घेऊन येणार याविषयी उत्सुकता आहे.
एखाद्या माणसाने जर मनाशी पक्के ठरवले, तर तो आयुष्यात कुठल्याही समस्येवर मात करून यशस्वी होऊ शकतो, ही या चित्रपटाची मध्यवर्ती संकल्पना आहे. प्रत्येकाला नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्याचा हेवा वाटत असतो. इतरांसारखे आयुष्य आपल्या वाट्याला नाही, याबद्दल तक्रार करत आपल्या हाती असलेले सहज सुंदर जगणंही हल्ली प्रत्येकजण विसरून गेले आहे. ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातही आयुष्याला कंटाळलेल्या एका व्यक्तीचा प्रवास मांडण्यात आला असून या प्रवासात त्याला मिळालेल्या विठ्ठलाच्या साथीमुळे काय बदल घडतो? याची रंजक कथा या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटात निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर विठ्ठलाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत मकरंद अनासपुरे मुंबईच्या डबेवाल्याच्या भूमिकेत दिसणार आहे. या दोघांसोबत दीपक शिर्के, कमलेश सावंत, स्मिता शेवाळे, सुनील गोडबोले, प्रदीप पटवर्धन, किशोर चौघुले, जयवंत वाडकर, योगेश शिरसाट, अभिजीत चव्हाण, मौसमी तोंडवळकर, पूर्वी भावे, तेजा देवकर, आणि बालकलाकार वरद यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.सादरीकरण आणि मांडणीत वैविध्य असलेल्या या सिनेमाचे संगीत देखील रिफ्रेशिंग झालंय. विजय शिंदे, दीपक कांबळी, मच्छिंद्र मोरे यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना रोहन-रोहन यांनी संगीतबद्ध केलं आहे. ‘मोबाईल’, ‘विठ्ठल विठ्ठल विठ्ठला’ आणि ‘लोणचं’ अशी वेगवेगळ्या जॉंनरची तीन गाणी या चित्रपटात आहेत. उत्तम स्टारकास्ट, दमदार संगीत असलेल्या ‘Thank U विठ्ठला’ या चित्रपटातील सुमधूर गीतांचा हा नजराणा प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील. 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :