रुबिक्स क्यूब चित्रपटाच्या संगीत सोहळयाला सलमान खानसह मैत्रिण युलिया वंतूरची ही उपस्थिती

महेश मांजरेकर यांचा मित्र असलेल्या सलमान खान च्या हस्ते सिनेमाच्या संगीताचं अनावरण करण्यात आलं. सलमानची मैत्रीण युलिया वंतूर हिने या सोहळ्यात सादर केलेलं नृत्यही उपस्थितांची दाद मिळवून गेलं

रुबिक्स क्यूब चित्रपटाच्या संगीत सोहळयाला सलमान खानसह मैत्रिण युलिया वंतूरची ही उपस्थिती
Published: 24 Feb 2017 04:42 PM  Updated: 24 Feb 2017 04:42 PM

मराठी सिनेमा, त्यातला आशय आणि तो सादर करण्याची पद्धत गेल्या काही महिन्यात कमालीची बदलते आहे. पण तो सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यात कमी पडतो अशी अनेकांची ओरड होती. हाच मुद्दा लक्षात घेऊन आपला सिनेमा अधिक चांगल्या पद्धतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा चंग बांधत अभिनेते, निमार्ता - दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी पुढाकार घेतला तो त्यांच्या आगामी रुबिक्स क्यूब या सिनेमाच्या निमित्ताने. या भव्य सिनेमाचा फर्स्ट लुक आणि संगीत अनावरण सोहळा नुकताच मुंबईत पार पडला. या सोहळ्याचं विशेष आकर्षण होतं ते यारोंका यार सलमान खान याची उपस्थिती. महेश मांजरेकर यांचा  मित्र असलेल्या सलमान खान च्या हस्ते सिनेमाच्या संगीताचं अनावरण करण्यात आलं. सलमानची मैत्रीण युलिया वंतूर हिने या सोहळ्यात सादर केलेलं नृत्यही उपस्थितांची दाद मिळवून गेलं. या भव्य सोहळ्यासाठी मराठी सृष्टीतलं अवघं तारांगण अवतरलं होतं. 
   
     मृण्मयी देशपांडे, गश्मीर महाजनी, सुरभी भोसले आणि सिद्धांत मुळ्ये या नव्या दमाच्या कलाकारांसह किरण यज्ञोपवीत, संदीप पाठक सारखे अनुभवी आणि मेधा मांजरेकर व महेश मांजरेकर या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमाचे कथा, पटकथा आणि दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं आहे तर फ्रेश संवाद इरावती कर्णिक यांनी लिहिले आहेत. 
     
        सिनेमाचे निमार्ते अविनाश अहाले  याबद्दल बोलताना सांगतात की, मराठी सिनेमा बदलाच्या दिशेने जात असताना त्यात माझा हातभार लागणं हे मी माझं सुदैव समजतो. तर आधीच्या सगळ्या सिनेमांपेक्षा काही तरी वेगळं करावं ही माझी इच्छा होती. नशिबाने तशी कथा लिहिली गेली. आणि ती कथा सत्यात उतरवण्यासाठी निर्मात्याचं पाठबळही मला मिळालं. हा सिनेमा माज्यासाठी खूप महत्वाकांक्षी आहे असं मत महेश मांजरेकर यांनी सिनेमाच्या म्युझिक लॉन्चच्या वेळी व्यक्त केलं. अहालेस मूवी मॅजिक आणि महेश मांजरेकर मूवीस यांची निर्मिती आणि जी बी एंटरटेन्मेन्ट प्रा. लि. यांची सहनिर्मिती असलेल्या या चित्रपटाची भव्यता बहारदार लोकेशन्स, दमदार स्टारकास्ट आणि सलमान च्या खास शुभेच्छांमुळे रुबिक्स क्युब  चित्रपटाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.


सरोगसी पद्धतीने कुंवारा बाप होण्याचा बॉलिवूडमध्ये ट्रेंड आला आहे का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :