Exclusive : ​राकेश बापट घेऊन येतोय ‘राजन’चा थरार!

मराठी सिल्वर स्क्रीनवरील ‘राजन’ या चित्रपटात राजनची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नाचा लवकरच उलगडा होणार आहे.

Exclusive : ​राकेश बापट घेऊन येतोय ‘राजन’चा थरार!
Published: 06 Aug 2017 10:02 AM  Updated: 06 Aug 2017 10:02 AM

भरत सुनंदा लिखित- दिग्दर्शित ‘राजन’ या सिनेमाचे टीजर पोस्टर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाले होते. ‘राजन कमिंग सून’ असे सांगणा-या या टीजर पोस्टरने प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेली होती.  साहजिकच हा ‘राजन’ कोण? याची उत्सुकताही होतीच. मराठी सिल्वर स्क्रीनवरील या चित्रपटात राजनची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पण  प्रेक्षकांना पडलेल्या या प्रश्नाचा लवकरच उलगडा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मराठी आणि हिंदीचा देखणा अभिनेता राकेश बापट या सिनेमात राजनची भूमिका साकारणार असल्याचे समजते. हिंदीत विशेष ओळख निर्माण करणा-या राकेशने मराठीतही आपल्या अभिनयाच्या जोरावर वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे. 



‘रिदम मुव्हीज प्रस्तुत वंश एंटरप्राईजेस’ यांची निर्मिती असलेला हा सिनेमा खरे तर‘राजन’  या शीर्षकामुळेच अधिक चर्चेत आला आहे.  मात्र, हा सिनेमा कुणाच्या व्यक्तिगत आयुष्यावर बेतलेला नसून तत्कालीन काळातील गुंडगिरीवर हा सिनेमा भाष्य करणारा आहे.  वामन पाटील, दिप्ती बनसोडे आणि सुरेखा पाटील यांची असलेल्या या चित्रपटात,तुषार पटेल यांनी कार्यकारी निर्मात्याची भूमिका पार पाडली आहे. राकेश बापट राजनच्या भूमिकेत कसा दिसेल, हे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर कळेल, तोपर्यंत प्रतीक्षा!! काय?

RELATED ARTICLES


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :