गणराय आले घरी...!

आज सर्वांच्या घरी गणरायांचे मोठ्या थाटामाटांत, जल्लोषात आगमन झाले. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला. बाप्पा घरी येऊन विसावले आहेत. गेल्या महिन्याभरापासून बाप्पा घरी कधी येणार ? हा एकच विचार आपल्या डोक्यात होता. गणराय घरी आल्यानंतर सगळीकडे चैतन्य, उत्साह, आनंद, जल्लोषाचे वातावरण असते.

गणराय आले घरी...!
Published: 25 Aug 2017 12:39 PM  Updated: 25 Aug 2017 12:39 PM

अबोली कुलकर्णी
 
आज सर्वांच्या घरी गणरायांचे मोठ्या थाटामाटांत, जल्लोषात आगमन झाले. ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो, तो क्षण अखेर आला. बाप्पा घरी येऊन विसावले आहेत. गेल्या महिन्याभरापासून बाप्पा घरी कधी येणार? हा एकच विचार आपल्या डोक्यात होता. गणराय घरी आल्यानंतर सगळीकडे चैतन्य, उत्साह, आनंद, जल्लोषाचे वातावरण असते. घराघरांत मस्तपैकी उकडीच्या मोदकांचा घमघमाट सुटलेला असतो. ‘एक...दोन..तीन..चार..गणपतीचा जयजयकार’ अशा आरोळया जागोजागी आपल्याला ऐकावयास मिळतात. असाच काहीसा आनंद आणि उत्साह  मराठी सेलिब्रिटींच्याही घरी पाहावयास मिळतो. त्यांचे बाप्पाविषयीचे विचार, आनंद, अनुभव ‘सीएनएक्समस्ती’ सोबत शेअर केला. पाहूयात, त्यांच्या घरी कशी असते बाप्पांच्या आगमनाची तयारी आणि धम्माल-मस्ती...* प्रिया मराठे
गणेशोत्सव म्हणजे आनंद, उत्साह, चैतन्य. आम्ही दरवर्षीच सगळे मिळून एकत्र बाप्पांच्या स्वागताची तयारी करत असतो. बाप्पांच्या डेकोरेशनसाठी आम्ही कुठलीही वस्तू विकत आणत नाही. तर स्वत:च्या हातांनी सगळ्या वस्तू बनवतो. प्लास्टिक, थर्माकॉल या वस्तुंचा वापर न करता आम्ही माती, दगड, पुठ्ठे यांचा जास्तीत जास्त वापर करत असतो. पर्यावरणाला हानीकारक असेल अशा कोणत्याच वस्तू आम्ही वापरत नाही. यंदा आम्ही बाप्पांच्या डेकोरेशनसाठी पिरॅमिड्स बनवायचे ठरवले आहेत. पुठ्ठ्यांचेच पिरॅमिड्स आम्ही बनवत आहोत. अतिशय पारंपारिक पद्धतीने आम्ही गणेशाचे स्वागत करतो. सकाळी सकाळी स्वयंपाकघरात मोदक बनवण्याची तयारी सुरू असते. पंगतीत बसून आम्ही मोदक खाण्याची शर्यत लावतो. या शर्यतीची मजाच काही और असते.* प्रार्थना बेहरे  
गणपतीला मी माझ्यासाठी प्रेरणास्थानी मानते. गणपती घरी आले की, घरात खुप चैतन्य असते. वेगवेगळया पदार्थांची रेलचेल असते. मलाही मोदक खुप आवडतात. माझ्या घरी गणपती येणार या विचारानेच मी खुप आनंदित आहे. माझे लग्न ठरल्यामुळे घरातील सर्वजण खुप उत्साहित आहेत. आम्ही दोघं मिळून बाप्पाच्या आगमनाची तयारी केली आहे. तरीही मी भरपूर शॉपिंग करण्यासाठी दादर स्टेशनवर जाणार आहे. बाप्पांसाठी खुप मोठी खरेदी अजून मला करायची आहे.

                                                                

* मानसी नाईक
गणपती बाप्पा घरी येतात तेव्हा घरात उत्साहाचे वातावरण असते. दहा दिवसांचा गणपती, आरास, उकडीचे मोदक, मखर अशी जय्यत तयारी असते. खरंतर मी बाप्पांची खूप मोठी फॅन आहे. दरवर्षी काहीतरी वेगळं करण्याचा माझा मानस असतो. या दिवसांत मी खूप मजा करते. प्रत्येक दिवस आनंदी जावा यासाठी प्रयत्न करते. मी माझ्या चाहत्यांना एकच संदेश सांगेन की, बाप्पांवर खूप खूप प्रेम करा. इको फ्रेंडली गणरायची मुर्तीची स्थापना करा. पर्यावरणाची कुठलीही हानी होणार नाही, याची दक्षता घ्या. कमीत कमी आवाजात गाणी वाजवा. गणेशोत्सव एन्जॉय करा. 

                                          

 * नेहा राजपाल
यंदा आम्ही बाप्पासाठी जय्यत तयारी केली आहे. आम्ही १० वर्षांपासून गणपती बसवतो आहोत. खरंतर ‘गो ग्रीन’ असा ट्रेंड या काळात सर्वांनी निर्माण करायला हवा. पर्यावरणाला या दिवसात कुठलीही हानी पोहोचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. आपण सर्वांनीच इको फ्रेंडली असणं गरजेचं झालं आहे. यंदाच्या आमच्या गणेशोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आम्ही शाडूची मूर्ती फार मोठी न करता आकाराने लहान केली आहे. त्यामुळे विसर्जनावेळी माती विरघळायला जास्त वेळ लागत नाही. दरवर्षी मी घरी छोटंसं, सुंदर असं डेकोरेशन करत असते. बाप्पा म्हटल्यावर काय उकडीचे मोदक, आरास, फॅमिली गेटटूगेदर आणि धम्माल मस्ती ही असतेच. त्यामुळे सर्वांनी गणेशोत्सव एन्जॉय करा, एवढंच मी सांगेन.
 


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :