मराठी चित्रपटांनी ‘या’ बॉलिवूड स्टार्सना लावलं याड!

बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनाही मराठी चित्रपटांचा लळा लावला आहे. त्यामुळे सध्या अनेक निर्माते मराठी चित्रपट निर्मितीसाठी सरसावत आहेत. नुकतेच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत दुसºया मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला.

मराठी चित्रपटांनी ‘या’ बॉलिवूड स्टार्सना लावलं याड!
Published: 09 May 2017 06:00 PM  Updated: 09 May 2017 06:02 PM

एककाळ असा होता की, मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळविण्यासाठी अक्षरश: धडपड करावी लागत असे. परंतु काही वर्षांचा विचार केल्यास नवे विषय घेऊन येणाºया मराठी चित्रपटांनी स्वत:चा नवा प्रेक्षक निर्माण केला आहे. केवळ प्रेक्षकच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक दिग्गज स्टार्सनाही मराठी चित्रपटांचा लळा लावला आहे. त्यामुळे सध्या अनेक निर्माते मराठी चित्रपट निर्मितीसाठी सरसावत आहेत. नुकतेच बॉलिवूडचा सिंघम अजय देवगण याच्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत दुसºया मराठी चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. पहिल्या ‘विटू-दांडू’ या चित्रपटाची निर्मिती केल्यानंतर तो दुसºया मराठी चित्रपटाची निर्मिती करीत आहे. अजयप्रमाणे इतरही काही बॉलिवूड निर्माते आहेत, ज्यांनी दर्जेदार चित्रपटांची निर्मिती केली आहे व करत आहेत, त्याचा हा आढावा...प्रियंका चोपडा (व्हेंटिलेटर)
बॉलिवूड-हॉलिवूडबरोबरच प्रादेशिक चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटविणाºया प्रियंका चोपडा हिच्या ‘व्हेंटिलेटर’ या मराठी चित्रपटाने जबरदस्त करिष्मा केला आहे. तब्बल ११८ कलाकारांना घेऊन बनविण्यात आलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळालेच शिवाय सर्वोच्च राष्टÑीय पुरस्कारानेही त्यास सन्मानित करण्यात आले. प्रियंकाचे हे यश इतरही बॉलिवूडमधील दिग्गजांना मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित करणारे असेल यात शंका नाही. जॉन अब्राहम (सविता दामोदर परांजपे)
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘विकी डोनर’ या चित्रपटाच्या माध्यमातून एक नवीन संदेश देत अभिनेता जॉन अब्राहमने चित्रपट निर्मिती क्षेत्रात यशस्वीरीत्या पदार्पण केले. दमदार कथानकांच्या चित्रपटांना प्राधान्य देत जॉनने आजवर त्याच्या ‘जेए’ निर्मितीअंतर्गत ‘मद्रास कॅफे’, ‘रॉकी हॅण्डसम’ आणि ‘फोर्स-२’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती केली. आता मराठी चित्रपटसृष्टीकडे असून, त्याच्या जेए एण्टरटेंमेंट्सअंतर्गत ‘सविता दामोदर परांजपे’ या मराठी चित्रपटाची तो निर्मिती करत आहे. चित्रपटात सुबोध भावे आणि राकेश बापट मुख्य भूमिकेत आहेत. शाहरूख खान

‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या दणदणीत यशानंतर शाहरु ख खान आणि रोहित शेट्टी ही जोडी मराठी चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करीत आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटात शाहरु ख पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत चमकणार आहे. रोहित शेट्टीने शाहरु ख खानशी मराठी चित्रपटाचा विषय आणि त्यासंदर्भात आधीच चर्चा केली होती. या विषयावर आपण काही करू शकतो का, असे विचारताच शाहरुखने लगेच होकार दिला होता. या चित्रपटाची पटकथा लिहून पूर्ण झाल्याचेही समजते.  रोहित शेट्टी (‘झाला बोभाटा’ रिमेक)
‘झाला बोभाटा’ या मराठी चित्रपटाचा रिमेक दिग्दर्शक रोहित शेट्टी अभिनेता अजय देवगनला घेऊन बनवणार आहे. रोहित शेट्टी या चित्रपटाचा ट्रेलर पाहून इतका भारावून गेला होता की, त्याने या चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्याचा निर्णय घेतला. सध्या गोलमान सीरिजच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त असलेला रोहित या चित्रपटाचे हक्क विकत घेणार आहे. करण जोहर (‘सैराट’ रिमेक)
मराठी चित्रपटसृष्टीत सर्वाधिक यशस्वी ठरलेल्या ‘सैराट’ या चित्रपटाने मराठीबरोबरच हिंदीच्याही प्रेक्षकांना अक्षरश: याड लावलं आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर तर या चित्रपटाच्या प्रेमात पडला असून, तो आता या चित्रपटाच्या हिंदी रिमेक बनविण्याची तयारी करीत आहे. या चित्रपटात कोण कलाकार काम करणार याविषयी अद्यापपर्यंत स्पष्ट झाले नसले तरी, शाहरूखचा मुलगा आर्यन खान, सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर यांच्या नावाची चित्रपटात वर्णी लागेल अशी मध्यंतरी चर्चा रंगली होती. त्याचबरोबर या चित्रपटाच्या कथेत कुठल्याही प्रकारचा बदल केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :