'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

पोस्टरमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी ची प्रस्तुती असणारा ‘फर्जंद' १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'फर्जंद' चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित
Published: 27 Apr 2018 11:17 AM  Updated: 27 Apr 2018 11:17 AM

छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या शूर मावळ्यांच्या पराक्रमावर आधारलेल्या ‘फर्जंद’ या चित्रपटाची उत्सुकता सर्वानाचा लागली आहे. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. बॉलिवूडचे ट्रेड अॅनलिस्ट तरण आदर्श यांनी आपल्या ट्विटर अकांऊटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. ‘फर्जंद' चे पोस्टर अतिशय लक्षवेधी आहे.पोस्टरमध्ये मराठीतील अनेक दिग्गज कलाकार पहायला मिळत आहेत. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी ची प्रस्तुती असणारा ‘फर्जंद' १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

 

‘फर्जंद' चित्रपटातून एक शिवकालीन लढाई आपल्या समोर येणार आहे. पन्हाळा किल्ला जिंकण्यासाठी ‘कोंडाजी फर्जंद’ या योद्धयाने आपल्या जीवाची बाजी लावत मूठभर मावळ्यांना सोबत घेत किल्ले पन्हाळ्यावर कशी यशस्वी चढाई केली होती? याचा रोमांचकारी इतिहास ‘फर्जंद’ या मराठी चित्रपटाद्वारे आपल्या समोर उलगडणार आहे. अनिरबान सरकार या चित्रपटाचे निर्माते असून संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार सहनिर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. या चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड यांचे असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे.कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.

 

‘फर्जंद’ युद्धपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाविषयीची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. यामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार? पोस्टरमध्ये दिसणारा बलदंड शरीरयष्टीचा तो युवक नेमका कोण? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पडले होते. या सारख्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरे चित्रपटाच्या पहिल्या टीझर मधून प्रेक्षकांना मिळाली आहेत. शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असलेला अभिनेता चिन्मय मांडलेकर तसेच रांगड्या युवकाची झलक प्रेक्षकांना पहिल्या टीझर मधून पहायला मिळाली असून अल्पावधीतच या टीझरने कमाल केली आहे. या टीझरचे हिट्स सातत्याने वाढत असून प्रेक्षकांच्या पसंतीची पावती टीझरला मिळाली आहे. ‘कोंडाजी फर्जंद’ आणि मावळ्यांनी किल्ले पन्हाळ्यावर यशस्वी चढाई केली होती या धाडसाची गाथा, दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘फर्जंद’ या चित्रपटाद्वारे उलगडली जाणार असून आपणास पुन्हा एकदा इतिहासाचे साक्षीदार होण्याची संधी मिळणार आहे.मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटामध्ये आहेत.
मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :