देवदत्त दिसणार 'या' नव्या भूमिकेत

देवदत्त नागे आपल्याला लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. तो एका नव्या चित्रपटाव्दारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

देवदत्त दिसणार 'या' नव्या भूमिकेत
Published: 17 May 2017 04:11 PM  Updated: 17 May 2017 04:33 PM

प्रेक्षकांचा आवडता खंडेराया अर्थात देवदत्त नागे लवकरच चित्रपटात झळकणार आहे. नुकतेच त्याचा जय मल्हार या त्याच्या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जय मल्हार या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिले होतेच मात्र खंडोबा या व्यक्तिरेखेला चाहत्यांचे विशेष प्रेम लाभले होते. गेल्या तीन वर्षांपासून खंडेराया याच भूमिकेत प्रेक्षकांनी देवदत्तला बघितले आहे. प्रेक्षकांच्या मनात देवदत्तने आपल्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळी जागा निर्माण केली आहे. गेली 3 वर्ष देवदत्तने फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. जय मल्हारच्या शेवटच्या एपिसोडच्या दिवशी त्याच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. शूटिंग कितीला संपले तरी देवदत्त आपले वर्कआऊट करणे चुकवत नव्हता. मालिके संपल्यानंतर  काही दिवसातच देवदत्तने त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयीची माहिती दिली आहे. या चित्रपटात देवदत्तची वेगळी भूमिका असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे म्युझिक लाँच करण्यात आले. वेलकम टू पट्टाया असे त्याच्या नव्या चित्रपटाचे नाव आहे.  याचित्रपटात देवदत्त नेमकी कोणती भूमिका साकारणार याबाबतचा खुलासा मात्र अद्याप झालेला नाही. तसेच या चित्रपटात देवदत्त सह वरद चव्हाण आणि विजय चव्हाण हे देखील दिसणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून विजय चव्हाण हे आजारी होते. त्यामुळे जवळपास 1  वर्षानंतर ते या चित्रपटाच्याव्दारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. हे वाचून नक्कीच त्यांचे चाहते खूश झाले असतील. याचित्रपटाची कथा प्रशांत नेमण याची आहे तर संगीत आनंद मेनन यांचे आहे. चित्रपटातील संवाद संजय सावंत यांचे आहे. त्यामुळे प्रेक्षक आपल्या लाडक्या देवाला मोठ्या पडद्यावर बघण्यास नक्कीच उत्सुक असतील. 


कंगना राणौतचा सिमरन हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :