थंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची "धूम"

ऋतू कोणताही असो स्टायलिश कपडे व ट्रेंडी लूक ऑलटाईम सेट असावा लागतो. तेव्हा या ट्रेंडी जॅकेट्सच्या कलेक्शनसह तुमची यंदाची थंडी ही अगदी स्टायलिश होऊन जाईल .

थंडीच्या मौसमात ट्रेंडी जॅकेट्सची "धूम"
Published: 20 Dec 2017 05:14 PM  Updated: 20 Dec 2017 05:18 PM

थंडीचा महिना आला कि वर्षभर कपाटात जपून ठेवलेले गरम कपडे वापरण्यासाठी बाहेर निघतात , आणि यंदा थंडीने मात्र लोकांची झोप उडवली आहे. त्यामुळे संपूर्ण दिवसभर गरम कपडे घालण्याला लोक प्राधान्य देतात . बाजारात मुलींसाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत पण मुलांना स्वेटर शिवाय काहीच पर्याय सुचत नाही किंबहुना नसतो. थंडीच्या दिवसांत ट्रेंडसेटर असणाऱ्या मुलांसाठी स्पायकरने  ट्रेंडी जॅकेट्सचा पर्याय दिला आहे. स्पायकर इंडिया नेहमीच ट्रेंडी आणि हटके स्टाईल लोकांसमोर आणत असते, जी खासकरून तरूणाईमध्ये खुपच गाजते. त्यात अशा गारेगार थंडीत ट्रेंडी जॅकेट्स खास मेन्स कलेक्शन स्पायकरने लाँच केलं आहे.ऋतू कोणताही असो स्टायलिश कपडे व ट्रेंडी लूक ऑलटाईम सेट असावा लागतो. तेव्हा या ट्रेंडी जॅकेट्सच्या कलेक्शनसह तुमची यंदाची थंडी ही अगदी स्टायलिश होऊन जाईल .   


कपाटात, बॅगेत , कुठे तरी अडगळीत ठेवलेले स्वेटर शोधण्याची वेळ गेले दोन दिवस मुंबईकरांवर आलीय... बाजारात स्वेटर आणि उबदार कपडे घेण्यासाठी नागरिकांची गर्दी वाढलीय..  रात्री दहानंतर गार वारे अंगाला झोंबू लागलेत. दरवर्षी केवळ हिवाळ्यातच व्यायामाचा किंवा मॉर्निंगवॉकचा उत्साह दाखविणारी मंडळीही सकाळी लवकर घराबाहेर पडताना दिसतायत. नियमित सकाळी फिरणारी लोक मात्र थंडीची चाहूल लागल्याचे अधिकारवाणीने सांगतातयत. दुपारच्या वेळी अंगाची काहिली माजवणा-या  उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पहाटेच्या वेळी मात्र गुलाबी थंडीचा सुखद धक्का बसतोय..

हवामानात अचानक बदल झाला असुन परंपरेप्रमाणे दिवाळीतच थंडीची चाहूल लागलीय.. गेले २ दिवस वातावरणात फरक जाणवण्यास सुरुवात झालीय.. विशेषतः संध्याकाळनंतर त्याची चाहूल लागतेय..  रात्रीच्या वेळी गारवा निर्माण झाल्याने सा-यांना हायसं वाटतय.. दिवसा अंगाची लाही लाही करणारे ऊन असताना मुंबईचे तापमान २० अंशांपर्यंत खाली आलं होतं.. बुधवारी वेधशाळेने नोंदवलेल्या तापमानात सांताक्रूझ मध्ये किमान तापमान २० अंश सेल्सिअस इतके होते तर कुलाब्यात किमान तापमान २३ पूर्णाक ६ अंश सेल्सिअस इतके तापमानाची नोंद झालीय... मुंबईत आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्याचेही पाहायला मिळतंय.. कुलाब्यात ४४ टक्के तर सांताक्रूझ मध्ये  आर्द्रतेचे प्रमाण ५४ टक्के इतके घसरलय.. 

 सध्या हवेत आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे कमी झालंय.. त्यातच उत्तरेकडील थंडीचा परिणाम हळूहळू दक्षिणेकडे सरकत चाललाय.कारण काहीही असो बोच-या आणि गुलाबी थंडीमुळे मुंबईकर चांगलेच सुखावले.सध्या थंडीची मजा मुंबईकरही लुटताना दिसतायेत.
 

RELATED ARTICLES


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :