१८० करोडच्या संपत्तीचा मालक आहे ‘बाहुबली’, अशी आहे लाइफस्टाइल !

जाणून घेऊया त्याच्या लाइफस्टाइलबद्दल.

१८० करोडच्या संपत्तीचा मालक आहे ‘बाहुबली’, अशी आहे लाइफस्टाइल !
Published: 11 Jul 2017 12:57 PM  Updated: 11 Jul 2017 12:59 PM

-Ravindra More
कमाईच्या बाबतीत रेकॉर्ड करणारा एस.एस. राजामौलीचा ‘बाहुबली२’चा फर्स्ट पार्ट ‘बाहुबली : द बिगनिंग’च्या रिलीजला दोन वर्ष पूर्ण झालेत. १० जुलै, २०१५ मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने वर्ल्डवाइड ६५० करोडपेक्षा जास्त कमाई केली होती. चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता प्रभासनेदेखील आपली फी वाढवून ३० करोड केली आहे. प्रभास जवळ सुमारे १८० करोडची प्रॉपर्टी आहे. जाणून घेऊया त्याच्या लाइफस्टाइलबद्दल.  

* साउथच्या अन्य सुपरस्टार्ससारखे प्रभासलाही लग्जरी कारांची आवड आहे. त्याच्या जवळ ८ करोड रुपयाची रोल्स रॉयल फॅँटम कार आहे. बऱ्याचदा या कारमध्ये ड्राइव्ह करताना त्याला पाहण्यात आले आहे. 

* याशिवाय हैदराबादचा पॉश परिसर जुबली हिल्समध्ये त्याचा अलिशान बंगला आहे. ज्याची किंमत करोडो रुपये आहे. चित्रपट नगरातही त्याचा एक बंगला आहे. हा बंगला त्याने २०१४ मध्ये खरेदी केला होता.  

* याशिवाय ‘बाहुबली’च्या यशानंतर प्रभासने बऱ्याच शूज ब्रॅँड आणि डिया कंपन्यांशी करारदेखील केला आहे. त्याची ब्रांड एंडोर्समेंटची फी सुमारे २ करोड आहे.  

* प्रभासचा जन्म २३ आॅक्टोबर १९७९ ला चेन्नईमध्ये झाला. त्याचे वडील दिग्दर्शक सूर्यनारायण आणि आईचे नाव शिव कुमारी आहे.   

* प्रभासचे शालेय शिक्षण भीमावरमच्या डीएनआर स्कूलमध्ये झाले आहे. आणि हैद्रबादच्या श्रीचैतन्य कॉलेजमधून बी.टेक.ची डिग्री घेतली आहे.  

* प्रभासचे निकनेम ‘डार्लिंग’ आणि ‘यंग रेबेल स्टार’ आहे. 

*  ‘बाहुबली’ मध्ये काम करीत असताना त्याने पुढील चार वर्षापर्यंत कोणताच दुसरा चित्रपट साइन केला नव्हता.  

* प्रभासला राजकुमारी हिरानीचे चित्रपट आवडतात मात्र ‘पीके’ आवडला नव्हता. 

* प्रभासची विशेष ओळख तेलुगु चित्रपटांसाठी आहे. २००२ मध्ये ‘ईश्वर’ चित्रपटात त्याने डेब्यू केला होता. त्यानंतर तो  'राघवेंद्र' (२००३), 'वर्षम' (२००४), 'चक्रम' (२००५), 'योगी' (२००७), 'एक निरंजन' (२००९), 'रेबेल' (२०१२) 'बाहुबली : द बिगनिंग' (२०१५) आणि बाहुबली : द कन्क्लूजन’ आदी चित्रपटात काम केले आहे. प्रभास आता अनुष्कासोबत ‘साहो’ चित्रपटात दिसेल.  
 
* प्रभासने बॉलिवूडमध्ये प्रभु देवाचा चित्रपट ‘एक्शन जॅक्शन’ (२०१४) मध्ये कॅमिओ केला होता.   

Also Read : ​​...तर ही आहे अमिताभ बच्चनची डेली रुटीन !


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :