ALERT : ‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या हल्ल्यापासून संगणकाला कसे वाचवाल?

माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतासह सुमारे १०० देश या व्हायरसने प्रभावित झाले आहेत.

ALERT : ‘रॅन्समवेअर’ व्हायरसच्या हल्ल्यापासून संगणकाला कसे वाचवाल?
Published: 17 May 2017 04:03 PM  Updated: 17 May 2017 04:03 PM

-Ravindra More
माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सध्या ‘रॅन्समवेअर’ व्हायरसने धुमाकूळ घातला असून भारतासह सुमारे १०० देश या व्हायरसने प्रभावित झाले आहेत. सायबर सिक्युरिटी फर्म अव्हास्टने सांगितले की, जगभरात जवळपास पंचाहत्तर हजार संगणकावर हा हल्ला झाला. शंभराहून अधिक देश या हल्ल्याचे शिकार झाले. विशेष म्हणजे या हल्ल्याचा सर्वात जास्त फटका इंग्लड ला बसला. इंग्लडमधील हॉस्पिटल्स आणि टेलिफोन यंत्रणा यामुळे पुर्णत: विस्कळीत झाली. अनेक हॉस्पिटल्स मध्ये तर रुग्णांचे आॅपेरेशन आणि अपाईनमेंट देखील रद्द करावे लागले तर अनेक ठिकाणी रुग्णांचा डेटा नससल्यामुळे डॉक्टरांवर कागद पेन घेऊन रुग्णांचा चार्ट तयार करण्याची वेळ आली.

काय आहे नेमके ‘रॅन्समवेअर’? 
तुम्ही संगणक किंवा लॅपटॉपवर काम करीत असताना अचानक एक मेसेज तुम्हाला दिसतो कि तुमचा संगणक किंवा लॅपटॉप आम्ही हॅक केलेले असून तुमचा संपूर्ण डेटा तुम्हाला हवा असल्यास स्क्रिन वर दिसत असलेल्या पेमेंट आॅप्शन ला क्लिक करून अमुक इतकी रक्कम ह्या बँक खात्यात पुढील अमुक इतक्या तासात जर ही रक्कम जमा झाली नाही तर तुमचा सर्व डेटा डिलिट होईल. तुमच्या स्क्रीनवर एका बाजूला तुम्हाला दिलेल्या वेळेचे काउंट डाऊन सुद्धा चालू झालेले असते. अर्थात तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा संपूर्ण ताबा ह्या हॅकर्स ने घेतलेला असतो. ह्या मेसेजच्या पुढे तुमचा संगणक किंवा लॅपटॉप जातच नाही अर्थात तुमची आॅपरेटींग सिस्टम चालूच होत नाही. ह्या प्रकारच्या सायबर गुन्हेगारीला रॅन्समवेअर असे म्हणतात. ह्या मध्ये कुणीतरी सायबर गुन्हेगार अज्ञात ठिकाणाहून तुमचा संगणक किंवा लॅपटॉप हॅक करतो आणी तुम्हाला खंडणीची मागणी करतो. असे प्रकार जगात अनेक ठिकाणी उघडकीस आलेले आहेत. जगाच्या कुठल्या तरी कानाकोपऱ्यात बसून तुमचा डेटा नष्ट करण्याचे उद्योग हे ‘सायबर भामटे’ करायला लागले.

काय काळजी घ्याल? 
* सगळ्यात आधी तर तुमच्या संगणक किंवा लॅपटॉप मध्ये चांगला अ‍ॅण्टीव्हायरस असणे तसेच अ‍ॅण्टीव्हायरस नियमित अपडेट असणे आवश्यक आहे.

* इंटरनेट वापरताना नेहमी सुरक्षित वेबसाईटलाच भेट द्या. कुठल्याही मोफत भूलथापाना बळी पडुन चुकीच्या वेबसाईटला किंवा अनोळखी लिंकला क्लिक करू नका .

* संगणक किंवा लॅपटॉपची आॅपरेटींग सिस्टमही नेहमी अपडेट असावी कारण अपडेट मध्ये बऱ्याच वेळा काही प्रॉब्लेम्स वर सोलुशन उपलब्ध असते. जसे कि 'रॅन्समवेअर' साठी पॅच मायक्रोसॉफ्ट ने दोन महिन्यापूर्वीच जारी केला होता .

* तुमच्या संगणक किंवा लॅपटॉपचा नियमित डेटा कॉपी करून दुसऱ्या हार्ड डिस्कवर ठेवावा म्हणजे तुमचा संगणक हॅक झाला आणि तुमच्या डेटा च्या बदल्यात हॅकर ने तुम्हाला पैसे मागीतले तरी तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही .

* स्मार्टफोनला ही धोका
संगणकांप्रमाणे स्मार्टफोनला ही हॅकिंग चा धोका वाढल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. अनेक वेळा तुमच्या स्मार्टफोन वर काही जाहिराती दाखवल्या जातात त्यातील काही जाहिराती ह्या हॅकरने तुम्हाला भुलवण्यासाठी सुद्धा टाकल्या असू शकतात. त्यामुळे अशा जाहिरातीला क्लिक करू नये तसेच एखादे एॅप तुमच्या स्मार्टफोन वर इन्स्टाल करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे की नाही हे पाहून घ्या. शक्यतो गुगल प्ले वरून एप इन्स्टाल करा. कुठलीही ‘ए पी के’ फाइल घेऊन तुमच्या स्मार्टफोनवर इंस्टाल करू नका. 


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :