वापरलेल्या ‘टी-बॅग’चा असाही उपयोग !

बरेचजण हे टी-बॅग्स् वापर झाल्यानंतर फेकून देतात. काहीजणांनी यावर अभ्यास करून या वापरलेल्या टी-बॅग्स्चा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केले आहे.

वापरलेल्या ‘टी-बॅग’चा असाही उपयोग !
Published: 18 May 2017 01:35 PM  Updated: 18 May 2017 01:35 PM

सध्या प्रत्येक घरात टी-बॅग्स् सहज उपलब्ध आहेत. मात्र बरेचजण हे टी-बॅग्स् वापर झाल्यानंतर फेकून देतात. काहीजणांनी यावर अभ्यास करून या वापरलेल्या टी-बॅग्स्चा पुनर्वापर कसा करता येईल यावर संशोधन केले आहे. जाणून घेऊया की, अजून कोणत्या दुसऱ्या कामासाठी वापरता येतील हे टी-बॅग्स्.

* टी-बॅगचा वापर नॅचुरल माउथवॉशसाठीही केला जाऊ शकतो. यासाठी टी-बॅगला कोमट पाण्यात काही वेळासाठी ठेवा, त्यानंतर त्याला थंड होऊ द्या. हे माउथवॉश आपण कधीही तयार करु शकता आणि हे केमिकल फ्री आणि सुरक्षितदेखील आहे. 

* जर आपल्या फ्रिज मध्ये दुर्गंधी येत असेल तर या टी-बॅगचा वापर केल्यास फायदेशीर ठरेल. यासाठी वापरलेले टी-बॅग्स् फ्रिजमध्ये ठेवावे. आपण या टी-बॅगला शूज मध्येही ठेऊ शकता. याने शूज मधून येणारी दुर्गंधी दूर होण्यास मदत होईल.

* लाकडाचे फर्निचर आणि फरशीची सफाईदेखील टी-बॅग्सने करु शकता. यासाठी कोमट पाण्यात टी-बॅग्स् टाक ा. त्यानंतर त्यात एक कपडादेखील टाकावा. या कपड्याने घरातील फरशी आणि फर्निचरची सफाई करावी. आपणास काही दिवसांनतर फरक जाणवेल. 

* जर आपल्या घरात काचेच्या खिडक्या असतील तर त्यांना टी-बॅग्स्ने साफ  करु शकता. शिवाय काचेच्या जेवढ्याही वस्तू असतील त्यांना आपण वापरलेल्या टी-बॅग्सने साफ करु शकता. याने आपल्या घराच्या खिडक्या आणि काचेच्या वस्तू नव्या दिसू लागतील.   

RELATED ARTICLES


गोलमाल अगेन या चित्रपटाबाबत उत्सुक आहात का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :