INTERNATIONAL WOMEN'S DAY SPECIAL : आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष : या अभिनेत्रींनी उंचावली महिलांची मान !

विविध क्षेत्रांपैकीच सिनेसृष्टीदेखील एक व्यापक क्षेत्र असून त्याठिकाणी मोठी स्पर्धा आहे. एवढी स्पर्धा असूनही जिद्द, चिकाटी, मेहनत, हुशारी, कौशल्य आदी गुणांच्या जोरावर काही अभिनेत्रींनी यश संपादन केले आणि महिला जातीचा सन्मान वाढविला.

INTERNATIONAL WOMEN'S DAY SPECIAL : आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष : या अभिनेत्रींनी उंचावली महिलांची मान !
Published: 07 Mar 2017 11:43 AM  Updated: 17 Mar 2017 04:08 PM

-Ravindra More

दरवर्षी ८ मार्च रोजी संपूर्ण जगभरात ‘आंतरराष्ट्रीय महिला दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या विशेष दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सन्मान आणि त्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल उत्सव साजरा केला जातो. विविध क्षेत्रांपैकीच सिनेसृष्टीदेखील एक व्यापक क्षेत्र असून त्याठिकाणी मोठी स्पर्धा आहे. एवढी स्पर्धा असूनही जिद्द, चिकाटी, मेहनत, हुशारी, कौशल्य आदी गुणांच्या जोरावर काही अभिनेत्रींनी यश संपादन केले आणि महिला जातीचा सन्मान वाढविला.
आजच्या या विशेष दिनाचे औचित्य साधून काही अभिनेत्रींविषयी माहिती देत आहोत ज्यांनी महिलांची मान उंचावली आहे...अमृता खानविलकर
अमृता खानवलकर ही मूळची मुंबई आहे. तिचे शालेय शिक्षण पुण्याच्या कर्नाटक हायस्कुलात झाले. तर महाविद्यालयीन शिक्षण मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज आॅफ कॉमर्स या महाविद्यालयात झाले.
अमृताची कारकीर्द झी टीव्ही दूरचित्रवाहिनीच्या इ.स. २००४ मधील ‘झी इंडियाज बेस्ट सिनेस्टार्स की खोज’ या गुणवत्ता-शोधन कार्यक्रमातील सहभागातून सुरू झाली. यात तिने तिसरा क्रमांक पटकावला. त्यानंतर सहारा वन दूरचित्रवाहिनीवरील ‘अदा’ या मालिकेत तिला भूमिका मिळाली. तिने झी म्युझिक वाहिनीवरील ‘बॉलिवुड टुनाइट’ या चित्रपट संगीतविषयक कार्यक्रमाचे सूत्रसंचालनही केले. ई टीव्ही मराठीवरील ‘कॉमेडी एक्सप्रेस’ (इ.स. २०१०) या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तिने केले. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाच्या पहिल्या कालखंडात तिने सुमारे साडेतीनशे भागांमध्ये संचालनाची सूत्रे सांभाळली. त्यानंतर काही काळाच्या विरामानंतर जुलै इ.स. २०१२ मध्ये तिने ‘कॉमेडी एक्सप्रेस’ कार्यक्रमात सूत्रसंचालनासाठी पुनरागमन केले.
‘फूँक ’ या हिंदी चित्रपटात निभावलेल्या उत्कृष्ट भूमिकेबद्दल तिला २००९ मध्ये मॅक्स स्टारडस्ट पुरस्कारांतर्गत ‘एक्सायटिंग न्यू फेस’ पुरस्कार मिळाला. 
२०१६ मध्ये ‘वन वे तिकिट’ या मराठी चित्रपटात काम करून तिने नावलौकिक मिळविला, शिवाय २०१६ मध्ये ‘२४’ (इंडियन सिरीज सीजन-२)मध्येही तिने अंतरा माने-शिंदेची भूमिका साकारून कौतुकास पात्र ठरली. 
 


रिंकू राजगुरु 
अख्ख्या महाराष्ट्रालाच नव्हे जगभरातील मराठी प्रेक्षकांना याड लावणारी आर्ची म्हणजेच रिंकू राजगुरु हिने ‘सैराट’ चित्रपटातील आपल्या अभिनयातून सिने क्षेत्रातील महिलांसमोर एकप्रकारे आदर्शच निर्माण केला. प्रेरणा महादेव राजगुरु हे तिचे नाव असून साखर कारखान्याच्या श्रीमंत मालकाच्या घरी जन्मलेल्या परंतु धाडसी आणि निश्चयी आर्चीची धडाकेबाज भूमिका अत्यंत नैसर्गिक अभिनयाने नटविल्याकारणाने सर्वत्र रिंकुचे कौतुक होत आहे. जीवनात प्रथमच सिनेमाच्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून इतका सुंदर अभिनय तिने कसा केला असेल याबद्दल तिचे सर्वच चाहते आश्चर्य व्यक्त करीत आहेत. 
विशेष म्हणजे तिच्या अभिनयामुळे ‘६३ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ सोहळ्यात स्पेशल ज्युरी पुरस्कार / विशेष उल्लेख पुरस्काराने ‘सैराट’ चित्रपटाला गौरवण्यात आले. तिच्या अभिनयाने प्रभावित झालेल्या कन्नड दिग्दर्शक श्री एस. नारायण ह्यांनी सैराटच्या कन्नड रिमेक ‘मनसु मल्लिगे, म्हणजेच ‘मन हा मोगरा’ करिता रिंकुला नायिका म्हणून घेतल आहे.सई ताम्हणकर
या मराठमोळ अभिनेत्रीचा जन्म: २५ जून १९८६ मध्ये सांगली  येथे झाला.  प्रामुख्याने मराठी चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत असलेल्या सईने आजवर अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘दुनियादारी’ या चित्रपटाच्या यशाने सईला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.
२००८ मध्ये ‘गजनी’ आणि २०१२ मध्ये ‘व्हिला’ या हिंदी चित्रपटांमधील तिची भूमिकादेखील उल्लेखनिय आहे. शिवाय तिचे २०१६ मधील ‘वाय झेड’, ‘जाऊंद्या ना बाळासाहेब’, ‘फॅमिली कट्टा’, ‘वजनदार, ‘राक्षस’ आदी चित्रपटांमधील भूमिका विशेष आठवणीतल्या ठरल्या आहेत. आलिया भट्ट 
सिनेसृष्टीत अल्पावधीत नावाजलेली अभिनेत्री आलिया भट्ट आपल्या अभिनयाने सध्या प्रकाशझोतात आहे. २०१२ साली प्रदर्शित झालेल्या करण जोहरच्या ‘स्टुडन्ट आॅफ द इयर’ ह्या चित्रपटामध्ये नायिकेची भूमिका करून आलियाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ह्या भूमिकेसाठी तिला सर्वोत्तम पदार्पणासाठीच्या फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तिने टू स्टेट , शानदार, हायवे, हम्पटी शर्मा कि दुल्हनिया, कपुर अँन्ड सन्स, ह्या चित्रपटात उल्लेखनीय काम केल आहे. तसेच ‘डिअर जिंदगी’ चित्रपटात बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान सोबत काम करून वेगळाच लौकिक मिळविला. शिवाय २०१६ साली प्रदर्शित झालेल्या ‘उडता पंजाब’ ह्या चित्रपटामधील भूमिकेसाठीदेखील तिला फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार मिळाला. प्रियांका चोप्रा
१८ जुलै १९८२ मध्ये जन्मलेली प्रियांंका चोप्रा ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. मिस वर्ल्ड ही आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धा जिंकणारी ती ५ भारतीय महिलांपैकी एक आहे. प्रियांका चोप्राने २००३ साली द हीरो नावाच्या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ती बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन स्वीकारणारी व सर्वात लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानली जाते. प्रियांका चोप्राला दोनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 
फेमिना मिस इंडिया स्पर्धा जिंकल्यानंतर २००० मध्ये प्रियांका चोप्राने विश्वसुंदरीचा किताबही पटकावला आणि ती प्रकाशझोतात आली. त्यानंतर तिने आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला. तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले ते तमिळ चित्रपटातून. पण त्यानंतर ती लगेच बॉलिवूडमध्ये आली.
‘अंदाज’ चित्रपटातील अष्टपैलू अभिनयामुळे तिला २००३ मध्ये ‘फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार’ मिळाला. शिवाय २००४ मध्ये ‘ऐतराज’साठी ‘फिल्मफेअर सर्वोत्तम खलनायिका पुरस्कार’, २००८ मध्ये ‘फॅशन’चित्रपटासाठी ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’आणि ‘फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार’ तसेच २०११ मध्ये ‘७ खून माफ’ या चित्रपटासाठी ‘फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री समीक्षक पुरस्काराने’ सन्मानित करण्यात आले. प्रियांकाने बॉलिवूडमध्येच नव्हे तर हॉलिवूडमध्ये ‘क्वॉंटिको’ या टिव्ही सिरीजच्या माध्यमातून प्रवेश करून आपल्या  अभिनयातून नाव लौकिक  मिळविला आहे.  दीपिका पादुकोण
२००६ पासून बॉलिवूडमध्ये काम करीत असलेल्या दीपिका पादुकोणचा जन्म ५ जानेवारी १९८६ रोजी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे झाला. दीपिका सध्या भारतामधील सर्वात लोकप्रिय व सुंदर अभिनेत्री मानली जाते. विविध भारतीय चित्रपटात काम करून तिने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहेच पण त्याचबरोबर ती आता हॉलिवूडमध्येसुद्धा कामे करीत असून तिचा विन डिझेल सोबतचा चित्रपट ‘ट्रिपल एक्स - रिटर्न आॅफ झेंडर केज’ हा नुकताच जानेवारीमध्ये प्रदर्शित झाला. 
उंच आणि शेलाटा बांधा लाभलेल्या दीपिकाने आपल्या कारकिदीर्ची सुरुवात एक मॉडेल म्हणून केली. २००६ मध्ये दीपिकाने कन्नड चित्रपट ऐश्वर्या मध्ये अभिनेता उपेंद्र याच्यासोबत भूमिका करून चित्रपटात काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००७ मध्ये फराह खानच्या ओम शांती ओम मध्ये अभिनेता शाहरूख खानसोबत प्रमुख भूमिका केली. या चित्रपटाने तिला मोठे व्यावसायिक यश आणि पुरस्कारही मिळवले.
विशेष म्हणजे दीपिका पदुकोण ही जगातली सर्वोत्तम दहाव्या क्रमांकाची अभिनेत्री असून तिने  फोर्ब्जच्या यादीत नाव पटकावले आहे. तिचे १ जून २०१५ ते ३१ मे २०१६ या काळातले उत्पन्न एक कोटी डॉलर्स असल्याचा अंदाज आहे.
बॅडमिंटनपटू प्रकाश पडुकोण आणि उज्ज्वला या दांपत्याच्या पोटी कोपनहेगन (डेन्मार्क) येथे दीपिकाचा जन्म झाला. एक छोट्या गटात राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत ती बॅडमिंटन खेळली, परंतु एक फॅशन मॉडेल होण्यासाठी खेळण्यातला रस कमी करून ती चित्रपटाकडे वळली आणि ‘ऐश्वर्या’ या कन्नड चित्रपटातून चित्रपटसृष्टीत २००६ मध्ये पदार्पण केले. तिच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील अभिनयामुळे तिला २००७ मध्ये ‘फिल्मफेअर सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार’ मिळाला. शिवाय २०१३ मध्ये ‘गोलियों की रासलीला राम-लीला’ या चित्रपटातील कामगिरीमुळेही ‘फिल्मफेअर सर्वोत्तम अभिनेत्री पुरस्कार’ तिने पटकावला.


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :