​पाहा, कोणत्या ‘बाइक’चे फॅन आहेत बॉलिवूड स्टार!

चला जाणून घेऊया कोणाजवळ कोणती बाइक आहे.

​पाहा, कोणत्या ‘बाइक’चे फॅन आहेत बॉलिवूड स्टार!
Published: 16 Jun 2017 01:07 PM  Updated: 16 Jun 2017 01:07 PM

आपण विचार करीत असाल की, बॉलिवूड स्टार्स महागड्या चारचाकी गाड्यांमध्ये फिरत असणार. मात्र सर्वचजण असे नाहीत तर काही स्टार्स बाइक्सचे मोठे फॅन आहेत. त्यांनी त्यांच्या आवडीनुसार आणि लाइफस्टाइलनुसार मोटर बाइक्सला कस्टमाइज केल्या आहेत. आणि ते त्यांना चालवितातदेखील. चला जाणून घेऊया कोणाजवळ कोणती बाइक आहे. 


* जॉन अब्राहम
बॉलिवूडमध्ये जॉन अब्राहमसारखा कोणताच स्टार बाइकचा एवढा पॅशनेट नाही. जॉन जवळ जेवढ्या बाइक आहेत, एवढ्या बाइक कोणत्याच स्टार जवळ नाहीत. जॉनने नुकतीच राजपुताना कस्टम्स लाइमलाइटतर्फे एक बाइक बनविली आहे. तिला लाइट फुट म्हटले जाते. याशिवाय त्याच्या जवळ सुजुकी हायाबूसा आणि अपरिलिया आरएसव्ही४ आहे. जॉन यामाहाचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसडर असल्याने त्याच्या जवळ ‘व्ही मॅक्स’ आणि ‘आर१’देखील आहे. 

Related image
* सलमान खान
बॉलिवूडचा दबंग सलमान खानला दोन गोष्टींची मोठी आवड आहे. पहिली म्हणजे बॉडी बनविणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे बाइकवर फिरणे. त्याच्याजवळदेखील कित्येक महागड्या स्पोर्ट बाइक्स आहेत. ज्यात लिमिटेड एडिशन सुजुकी इंट्रूडर ‘एम १८ आरझेड आयझेडवाय’ शिवाय ‘हायाबूसा’ आणि‘ यामाहा आर१’चा समावेश आहे.


* विवेक ओबेरॉय
बॉलिवूड स्टार्समध्ये विवेक ओबेरॉय जवळ सर्वात महागडी बाइक आहे. २०१० मध्ये त्याने डुकाटी 1098 खरेदी केली होती. त्या बाइकची किं मत सुमारे ४५ लाख रुपये आहे. 


* आर माधवन
गुपचूप राहणारा आर माधवन हा कलाकार मात्र जेव्हा बाइक फॅन्सची गोष्ट चर्चेत येते तेव्हा तो चमकुन उठतो. काही दिवसांपुर्वीच त्याने ‘बीएमडब्ल्यू के १६०० जीटीएल’ खरेदी केली. 

Image result for shahid kapoor with his bike
* शाहिद कपूर
शाहिदला फावल्या वेळेत बाइक चालविणे खूप आवडते. यासाठी लग्नानंतर त्याने त्याची आवडती बाइक ‘हार्ले डेविडसन’ खरेदी केली.

Related image
* रणबीर कपूर
रणबीरला कार्सची जास्त आवड आहे. मात्र त्याच्या जवळ हार्ले डेविडसन व्ही-रोड आहे. आपण त्याला रॉय चित्रपटात ही बाइक चालविताना पाहिले असेलच. त्याची दुसरी बाइक हार्ले डेविडसन फॅट ब्वॉय आहे जी त्याला संजय दत्तने गिफ्ट दिली होती. 

Related image
* शाहरुख खान
शाहरुखदेखील बाइक्सचा मोठा फॅन आहे, मात्र बॅक प्रॉब्लेममुळे गौरीने त्याला बाइक घेण्यास मनाई केली आहे. तरीही त्याने ‘केटीएम ड्यूक २००’ घेतली आणि तिच्यावर लेफ्ट साइडला आपले इनिशियलदेखील लावले. 

Image result for siddharth malhotra with his bike
* सिद्धार्थ मल्होत्रा
सिद्धाथ मल्होत्राने स्वत:च्या वाढदिवशी हार्ले डेविडसन फॅ ट बॉब खरेदी केली होती. जानेवारी महिन्यानंतर रस्त्यांवर सिद्धार्थ बऱ्याचदा ही क्रूजर चालविताना दिसला होता. 


* रणवीर सिंह 
‘लुटेरा’ चित्रपटात रणवीर एक जुन्या जमान्याची बाइक चालविताना दिसला. ही एक विंटेज एरियल बाइक आहे. शुटिंग दरम्यान रणवीर या बाइकचा फॅन झाला. यासाठी निर्देशन विक्रमादित्य मोटवानीने त्याला ही बाइक गिफ्ट दिली. 

Source : inextlive


माधुरी दीक्षितचा बकेट लिस्ट बॉक्स ऑफिसवर हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :