​‘ब्लू व्हेल’ गेममुळे अमिताभ बच्चनदेखील चिंतेत !

आपलेही मुले व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक वापरत असतील तर त्वरित लक्ष द्या, कारण हा गेम खूपच धोकादायक असून जो फक्त मुलांना प्रभावित करीत आहे.

​‘ब्लू व्हेल’ गेममुळे अमिताभ बच्चनदेखील चिंतेत !
Published: 04 Aug 2017 12:46 PM  Updated: 04 Aug 2017 01:22 PM

‘ब्लू व्हेल’ नावाचा इंटरनेट गेम सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा गेम खूपच धोकादायक असून जो फक्त मुलांना प्रभावित करीत आहे. जो कोणी या गेमच्या बाबतीत ऐकत आहे, तो चिंता व्यक्त करीत आहे. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीदेखील याबाबतची चिंता ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. अमिताभ यांनी ट्विटवर लिहिले आहे की, ‘भयंकर बातमी वाचली, इंटरनेटवर युवक एक भयानक खेळ खेळत आहेत. जीवन जगण्यासाठी असते, वेळेच्या अगोदर गमविण्यासाठी नव्हे....’ 

३० जुलै रोजी मुंबईच्या अंधेरी ईस्टच्या शेर-ए-पंजाब कॉलनीमध्ये एका १४ वर्षीय मनप्रीत सिंह साहनीने पाच मजली इमारतीवरुन उडी मारुन आपला जीव दिल्याची घटना घडली. असे म्हटले जात आहे की, त्याने ‘ब्लू व्हेल’ गेमचे टास्क पूर्ण करण्यासाठी हे पाऊल उचलले. त्याने इयत्ता नववीत शिकणाऱ्या त्याच्या मित्राला मॅसेज पाठविला होता की, ‘मी इमारतीवरुन उडी मारत आहे.’  

Amitabh Bachchan alarmed by The Blue Whale game - Bollywood News in Hindi

* काय आहे ब्लू व्हेल गेल
ब्लू व्हेल हा एक आॅनलाइन गेम आहे. या गेमची सुरुवात रूसपासून झाली आहे. या गेममुळे आतापर्यंत सुमारे २५० मुलांचा जीव गेला आहे. या गेमला प्रत्येकजण खेळू शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक प्रोफाइलद्वारे या गेमची इन्व्हिटेशन लिंक पाठविली जाते. हा गेम कोणी खेळावा हे या गेमचा अ‍ॅडमिन ठरवितो.  

* १० ते १८ वयातील मुलांना केले जाते लक्ष्य 
या गेमसाठी १० ते १८ वयातील मुलांना लक्ष्य केले जाते. गेमचा अ‍ॅडमिन व्हॉट्सअ‍ॅप आणि फेसबुक प्रोफाइलद्वारे या किशोरवयीन मुलांना या गेमची इन्व्हिटेशन लिंक पाठवितो. यासाठी ते अशा मुलांची प्रोफाइल नेहमी चेक करीत असतात. त्यानंतर जे मुले या गेमच्या सर्व नियमांचे पालन करु शकतील अशा मुलांना लक्ष्य करुन लिंक पाठवितात.  

* ५० दिवसाचे धोकादायक टास्क  
हा गेम ५० दिवसापर्यंत खेळला जातो. विशेषत: ५० व्या दिवशी या गेमचा आणि हा गेम खेळणाऱ्याचा शेवटचा दिवस असतो. या गेमच्या सुरुवातीला खेळणाऱ्याच्या हातावर ब्लेडने कट मारुन त्याचा फोटो अ‍ॅडमिनला पाठविण्याचे आवाहन केले जाते. त्यानंतर त्या मुलाला सकाळी लवकर उठून हॉरर चित्रपट किंवा हॉरर व्हिडिओ पाहण्याचे सांगण्यात येते. त्यानंतर मुलाला त्याच्या भोवताली उंच बिल्डिंग शोधण्याचे सांगण्यात येते. त्यानंतर बिल्डिंगच्या सर्वात वरच्या मजल्यावरील छतावर एका कोपऱ्यात उभे राहण्याचे सांगून आत्महत्येस प्रवृत्त केले जाते. 


   


कपिल शर्माचा छोट्या पडद्यावरील कमबॅक हिट ठरेल का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :