​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !

बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे.

​OMG : तब्बल १० लाखाच्या बेडवर झोपायचा बाबा राम रहीम, अशी होती लाइफस्टाइल !
Published: 06 Sep 2017 10:54 AM  Updated: 06 Sep 2017 10:54 AM

डेरा सच्चा सौदाचे प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला स्पेशल सीबीआय कोर्टाने बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरवले आहे. सत्संग, प्रवचन, अ‍ॅक्टिंग, सिंगिंग आणि डान्स करणारे हे बाबा भारतातील अन्य बाबांपेक्षा खूप वेगळे होते. बाबा गुरमीत आपल्या डिफरंट लाइफस्टाइलमुळे नेहमी चर्चेत राहायचे. बाबांना लोक प्रवचनांपेक्षा महागड्या गाड्या, एक्सपेंसिव कपडे आणि जबरदस्त लाइफस्टाइलमुळे जास्त ओळखायचे. 

PunjabKesari

बाबा गुरमीत राम रहीमचे राहणीमान साधारण नव्हते. त्यांचे लाइफस्टाइल एखाद्या साधारण संताप्रमाणे नव्हते. बाबाने सिरसामध्ये एक विलासी रिझोर्ट बनविले होते ज्याठिकाणी सर्व गैरप्रकार चालायचे. या रिझोर्टमध्ये बाबाची एक मोठी खोली होती. ही खोली साधारण नव्हती, ज्या बेडवर बाबा झोपायचे त्या बेडची किंमत सुमारे १० लाख होती आणि हा बेड विदेशातून मागविण्यात आला होता. 

PunjabKesari

एवढेच नव्हे तर बाबा ज्या रुममध्ये झोपत होते त्याठिकाणी आतच एक लहान स्वीमिंग पूल होता आणि होम थिएटरदेखील लावण्यात आला होता. विशेष म्हणजे या खोलीतील त्या बेडसाठी विदेशातून स्पेशल चादर आणि उशी मागविल्या जात होत्या. ९१ एकरच्या जागेत बनविलेल्या या रिझोर्टमध्ये बाबाने आपल्या अय्यासीसाठी १६ मोठे व्हिला अणि ५८ खोल्या बनविल्या होत्या.   

PunjabKesari

बाबाच्या या रिझोर्टमध्ये व्हिआयपी लोक  राहायचे आणि याठिकाणी राहण्याचा एक दिवसाचा खर्च लाखो रुपये होता. एवढेच नव्हे तर या रिझोर्टमध्ये एक स्वीमिंग पूल आणि जकूजी स्पादेखील बनविण्यात आला होता.  

PunjabKesari
    
गूगलवर सर्वांपेक्षा जास्त सर्च केली जाणारी बॉलिवूड सेलिब्रिटी सनी लियोनी पासून अनिल कपूर पर्यंत बाबाचे फॉलोवर्स होते.    
 


गोलमाल अगेन या वर्षातील सगळ्या चित्रपटांचे रेकॉर्ड मोडणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :