​आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?

‘पुणे तिथे काय उणे...’ असे म्हणतात ते खोटे नाही. एकदा पुण्याला गेले की या ठिकाणांना अवश्य भेट द्या...

​आपण पुण्यातील ‘या’ आकर्षक ठिकाणांना भेट दिली का?
Published: 21 Apr 2017 05:35 PM  Updated: 23 Apr 2017 11:33 AM

-Ravindra More
‘पुणे तिथे काय उणे...’ असे म्हणतात ते खोटे नाही. पुणे हे महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. हे शहर महाराष्ट्राच्या पश्चिम भागात, मुळा व मुठा ह्या दोन नद्यांच्या किनारी वसलेले असून पुणे जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. नागरी सोयीसुविधा व विकासाबाबतीत पुणे हे महाराष्ट्रात मुंबईनंतर अग्रेसर आहे. या शहराच्या नावाचे POONA हे  इंग्रजी स्पेलिंग सुमारे १५० वर्षे प्रचलित होते. विद्येचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात अनेक आकर्षक ठिकाणे आहेत ज्याठिकाणी आपण एकदा अवश्य भेट दिलीच पाहिजे. आज आपण त्या आकर्षक ठिकाणांबाबत जाणून घेऊया. 

Image result for आगा खान पॅलेस पुणे

* आगा खान पॅलेस
आगा खान पॅलेसने भारतीय स्वतंत्रताचे प्रत्येक चढ-उतार पाहिले आहेत. याठिकाणी महात्मा गांधी व कस्तुरबा गांधीसह कित्येक नेत्यांनी भारत छोडो आंदोलनात सहभाग घेऊन जेलची सजा भोगली होती. या किल्लयाची उभारणी सुलतान मोहमंद शाह आगा खानने केली होती.

Image result for ओशो आश्रम पुणे

* ओशो आश्रम
पुण्याच्या कोरेगावात ओशो आश्रमाची निर्मिती रजनीश ओशोने केली होती. याठिकाणी लोकांना ओशोच्या विचारधारांच्या बाबतीत सांगितले जाते. मानसिक शांतीसाठी योग शिकविला जातो आणि जीवन जगण्याच्या कलेविषयीदेखील सांगितले जाते. वर्षभर खुला असणाºया या आश्रमात मात्र आवासाची सुविधा नाही आहे. 

Image result for पटलेश्वर गुफा मंदिर पुणे

* पटलेश्वर गुफा मंदिर
या मंदिरातील गुफा एलिफंटा आणि एलोरा गुफांशी मिळत्या-जुळत्या आहेत. हे मंदिर भगवान पटलेश्वरला समर्पित असून या मंदिरात दर्शन सकाळी ८ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत केले जाऊ शकते. 

Image result for शनिवार वाडा पुणे

* शनिवार वाडा
शनिवार वाड्याला महाराष्ट्रात ऐतिहासिक महत्त्व असून १७३० मध्ये पेशवा राजवंशाचे राजा बाजीरावने बनविला होता. मात्र १८२७ मध्ये याठिकाणी आग लागली आणि वाड्यातील प्रत्येक कलाकृती नष्ट झाली होती. याठिकाणी जर भेट दिलीच तर येथील लाइट व्यवस्थेला आवर्जून पाहा. येथील मुगल शैली आपणास नक्कीच आवडेल.* जनजातीय संग्रहालय
जनजातीय संग्रहालय पुणे जिल्ह्यात कोरेगाव रोडच्या पूर्व दिशेला स्थित आहे. याठिकाणी आदीवासींचे जीवन आणि संस्कृतिवर प्रकाश टाकण्यात आला आहे. याठिकाणी जनजातीय अनुसंधान आणि प्रशिक्षण संस्थानदेखील आहे. या संग्रहालयात विविध हत्यारे आणि कलाकृतींच्या प्रदर्शनावर जास्त लक्ष देण्यात आले आहे. हे संग्रहालय रविवार शिवाय सर्व दिवस खुले असते. याला पाहण्यासाठी सकाळी १० पासून ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंतची वेळ ठरविण्यात आली आहे. * विसापुर किल्ला
पुणे स्थित विसापुरचा किल्ला पेशवा राजवंशाचे राजा बालाजी विश्वनाथ यांनी बनविला होता. या किल्लयात कित्येक शासकांनी शासन चालविले आहे. या किल्लयामध्ये गुफा, खांब, स्काय-हाय-वाल्स आणि हनुमानाचे मंदिरदेखील आहे. पेशवा परिवाराचे लोक याच किल्लयात राहत होते. त्यांचा महल आतादेखील याठिकाणी एक खंडरच्या रुपात उभा आहे. 

Image result for भूलेश्वर मंदिर पुणे

* भूलेश्वर मंदिर
भूलेश्वर मंदिराला पांडव काळादरम्यान बनविण्यात आले होते जे ८०० वर्ष जुने आहे. हे मंदिर एका घनदाट जंगलात असल्याने त्याला भूलेश्वर म्हटले जाते. या मंदिरात भगवान शिव आणि त्याच्या पाच लिंगांची पूजा केली जाते. भगवान विष्णु आणि देवी लक्ष्मी यांची मुर्तिदेखील मंदिरात लावण्यात आली आहे. 

Image result for देहु मंदिर पुणे

* देहु मंदिर
 देहु मंदिराला संत तुकाराम यांच्या जन्मभूमिच्या रुपात ओळखली जाते. हे मंदिर त्यांच्याच लहान मुलाने बनविले होते. या मंदिराच्या जवळच भगवान अयप्पा यांचे मंदिर आहे जे दर्शनासाठी नेहमी खुले असते. 

Image result for visit to best places in pune

* नाग पार्क
या पार्कमध्ये सापांच्या सुमारे १६० पेक्षाही जास्त प्रजाती पाहावयास मिळतात. या पार्क ची निर्मिती १९८६ मध्ये करण्यात आली होती. याठिकाणी सापांशिवाय अन्य जीव-जन्तुदेखील पालन केले जातात. याठिकाणी ९ फुट लांबीचा कोब्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. नागपंचमीचा सण याठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आणि लोकांना सापांच्या बाबतीत जागृतदेखील केले जाते, जेणेकरु न सापांचे संवर्धन होईल. 

Image result for सरस बाग पुणे

* सारसबाग
सारसबाग पुण्यात एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. या बागेची निर्मिती नानासाहेब पेशवाद्वारा करण्यात आली होती. ही सुंदर बाग पार्वती हिल्सजवळ स्थित आहे. या बागेत गणपतीचे मंदिरदेखील आहे.  


Also Read : ​अनुभवा श्रीलंकेमधील पर्यटनाचा आनंद
                : ​रामोजी ‘फिल्म सिटी’...एक विलोभनीय पर्यटनस्थळ !


मराठी बिग बॉस हिट ठरणार का?

ABOUT US

CNX Masti is India's first and largest entertainment destination in Marathi. It brings you the latest news and happenings from the world of Marathi cinema, Bollywood, Hollywood, Television, Marathi theatre, live events and parties. Click for some exclusive gossips, interviews, behind the scenes, latest movie reviews and celebrity interviews. CNX Masti is truly the BAAP OF ENTERTAINMENT in Marathi.

Follow us :